मुंबई : तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही आजच ही बातमी वाचणं गरजेचं आहे. 35 टक्के अँड्रॉईड फोनमध्ये अजूनही सिक्युरीटी नाही. त्यामुळे फोन हॅक होण्याचा धोका आहे. अशा फोनवर हॅकर्सची नजर आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमचा फोन अपडेट केला नसेल तर आजच करून घ्या. नाहीतर तुमचा फोन हँग होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सुप्रसिद्ध अँटीव्हायरस बिटडेफेंडरने अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सुरक्षेबाबत एक नवीन अहवाल जारी केला. अहवालात असे म्हटले आहे की, अनेक स्मार्टफोन अजूनही अँड्रॉइडच्या जुन्या व्हर्जनवर चालतात. सिक्युरिटी पॅचेस न मिळाल्याने, या जुन्या व्हर्जनसाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे हॅकर्सना हॅक करण्याची संधी मिळेल. 


हॅकर्स बिटडेफेंडर अॅपचा वापर करून हॅक करत आहेत. Android 12 आणि 11 ज्यांनी अपडेट केले नाहीत त्यांना सगळ्यात जास्त हॅकर्सपासून धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या फोनमधील व्हर्जन अपडेट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सिक्युरिटी पॅच येतो जो आपल्या फोनला हॅकर्सपासून सुरक्षित ठेवतो. 


नवा फोन खरेदी करताना त्यामध्ये अपडेट केलेलं अँड्रॉईड व्हर्जन आहे का ते तपासून पाहा. जर नसेल तर अपडेट होणारं असेल तर करून घ्या. जुन्हा व्हर्जनमध्ये फोन घेणं म्हणजे हॅकर्सना आमंत्रण देण्यासारखं आहे.