व्हॉट्सअॅप सारखंच येतंय आता नवं अॅप
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच इंस्टेंट मॅसेजिंग अॅप आणणार आहे. कंपनीने आपलं नवं इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम घेऊन येणार आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला पर्याय देणार आहे.
नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच इंस्टेंट मॅसेजिंग अॅप आणणार आहे. कंपनीने आपलं नवं इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम घेऊन येणार आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला पर्याय देणार आहे.
अॅमेझॉनचा अॅनिटाईम अॅप आयओएस, अँड्राईड आणि डेस्कटॉप तिघांना सपोर्ट करणार आहे. सध्या हे अॅप टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच लॉन्च केलं जाणार आहे.
अॅमेझॉनचं अॅनिटाईम अॅपमध्ये तुम्ही ग्रुप चॅट, वॉईस/व्हीडियो कॉल, एन्क्रिप्शन आणि स्टिकर यासारख्या सर्विस तुम्हाला मिळणार आहे. व्हॉट्सअॅपपेक्षा अधिक ऑप्शन देखील यामध्ये असू शकतात.
या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत बोलत असतांना तुमचा नंबर त्यावर दिसणार नाही. व्हॉट्सअॅप किंवा इतर अॅपमध्ये मात्र तुमचा नंबर दुसऱ्याला कळतो.