सिस्टीम अपडेटच्या नावाखाली अॅपल, सॅमसंगने ग्राहकांना फसवलं
अॅपल आणि सॅमसंगवर एक कोटी आणि 57 लाख डॉलर्सचा दंड ठोठावलायं.
मुंबई : अॅपल आणि सॅमसंगला कोट्यावधींचा दंड सुनावण्यात आलायं. ग्राहकांचे फोन जाणूनबुजून स्लो आणि निकामी करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलायं. रोम आणि इटलीच्या प्राधिकरणाने हा दंड सुनावलायं. अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्या बेईमान असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिलंय. इटलीच्या प्रतिस्पर्धा आयोगाने (एजीसीएम) अॅपल आणि सॅमसंगवर एक कोटी आणि 57 लाख डॉलर्सचा दंड ठोठावलायं.
अॅपलचा धोका
अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्या सॉफ्टवेयर अपडेट करण्याच्या बहाण्याने मुद्दाम ग्राहकांचे फोन स्लो करत असल्याचे तसेच कार्यप्रणाली बिघडवत इटली प्रतिस्पर्धी आयोगाने म्हटलं.
2016 मध्ये 'आयफोन' आपल्या ग्राहकांना सारखंसारखं सॉफ्टवेयर अपडेट करण्याचे नोटीफिकेशन पाठवत होता.
आगामी येणाऱ्या आयफोन 7 ला डोळ्यासमोर ठेवून हे अपडेट करण्यात येत होते. आपण ग्राहकांचे फोन स्लो करत असल्याचे, तसेच यामुळे सिस्टिममध्ये बिघाड होऊ शकतो असे यावेळी 'आयफोन'ने सांगितलं नाही.
सॅमसंगनेही फसवलं
हे झालं अॅपलचं. दुसरीकडे लोकांच्या मनातील विश्वास असलेल्या सॅमसंगनेही ग्राहकांसोबत धोका केलायं.
सॅमसंगने आपल्या ग्राहकांना गूगलची अॅण्ड्रॉइड सिस्टिमचे नवे वर्जन इंस्टॉल करण्यास सांगितलं. गॅलेक्सी नोट 7 डोळ्यासमोर ठेवून हे बदल होत होते.
हे अपडेट होताच ग्राहकांचे गॅलेक्सी नोट वापरकर्त्यांचे जुने फोन निकामी झाले.