नवी दिल्ली : स्वस्त दरात iPhone 11 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने ऍपलसोबत भागीदारी करत ऍपल डेज सेलची Apple days sale सुरुवात केली आहे. या सेलमध्ये ऍपलच्या आयफोनशिवाय आयपॅड, मॅकबुक, ऍपल वॉच आणि इतर डिवाइसेस स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकतात. 18 जुलैपासून सुरु झालेला हा सेल 25 जुलै 2020 पर्यंत सुरु राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेलमध्ये ऍपल आयफोन 11वर कपंनीकडून 5400 रुपयांची सूट मिळत आहे. या आयफोनची सुरुवातीची किंमत 68,300 रुपये आहे. मात्र, या सेलमध्ये हा फोन 62,900 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.


एचडीएफसी बँकेच्या HDFC BANK क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरुन iPhone 11 Pro किंवा iPhone 11 Pro Max खरेदी करायचा असल्यास, त्यावर 4000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळू शकतो. त्याशिवाय आयपॅड, ऍपल वॉच, आयपॅड एक्सेसरिज आणि इतर मॅक एक्सेसरीस किबोर्ड, केबल्स, पॉवर अडॉप्टरवरही सूट मिळू शकते.


'आरोग्य सेतु' ठरलं जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेलं कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग ऍप


या सेलमध्ये ऍपल वॉच 23,900 रुपयांत मिळू शकतो. एचडीएफसी कार्डवरुन खरेदी केल्यास 1000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. तर आयपॅडवर 5000 रुपयांची सूट मिळत आहे. एचडीएफसीच्या डेबिड आणि क्रेडिट कार्डवरुन मॅकबुक प्रो खरेदी केल्यास 7000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकतो.