सेन्ट फ्रांसिस्को : अॅपलने अॅपल अॅप स्टोऱवरून अॅप आणि गेम डाऊनलोड किंवा खरेदी करण्यासाठी सुमारे ३० कोटी डॉलर खर्च केले. २००८ मध्ये अॅपल अॅप स्टोऱ लॉन्च केल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा खर्च आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुपरटिनो स्थित आयफोन निर्मात्यांनी सांगितले की, ख्रिसमसच्या संध्याकाळपासून एक जानेवारीपर्यंत ग्राहकांनी अॅप्स डाऊनलोड आणि खरेदी करण्यासाठी सुमारे ८९ कोटी डॉलर खर्च केले. अॅपलचे जागतिक मार्केटिंग उपाध्यक्ष फिल सिहिलर यांनी सांगितले की, आम्ही नविन अॅप स्टोरवर प्रतिक्रिया पाहून आणि ग्राहकांना नवीन अॅप्स व गेम्स वापरऱ्यासाठी दिल्याने खूप आनंद होत आहे. 


डेव्हलपर्सने कमावले २६५० कोटी डॉलर 


पुढे ते म्हणाले की, फक्त २०१७ मध्ये नाही तर आयओएस डेव्हलपर्सने २६५० कोटी डॉलर कमावले. ही कमाई २०१६ पेक्षा ३०% जास्त आहे. ग्राहकांनी आतापर्यंत सुमारे २००० आरकीट वर आधारित गेमचा आनंद घेतला आहे.


आयफोनने मागितली माफी


यापूर्वी अॅपल आयफोनचे जूने मॉडल्स स्लो चालत असल्याने अॅपलकडे खूप तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ही कंपनी चर्चेत होती. यासाठी अॅपलने सार्वजनिक पद्धतीने माफी मागितली. त्याचबरोबर कंपनीने काही हॅडसेटची बॅटरी माफक दरात बदल्याचा पर्याय दिला होता. 
बॅटरी संबंधित तक्रारी आल्यानंतर कंपनी हे मुद्दाम करत असल्याची शंका उपस्थित केली जात होती. कारण त्यामुळे फोनचे मॉडल अपग्रेड करण्यासाठी ग्राहक प्रवृत्त होतील.