Apple Event : प्रत्येक सेंकंदाला ऍपल कंपनी बनवते `इतके` आयफोन, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
सर्वात पहिला आयफोन 2007 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. आज आयफोन 14 चं अधिकृत लॉन्चिंग (Iphone 14 Launch) करण्यात आलं आहे.
Apple Event 2022: सर्वात पहिला आयफोन 2007 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. आज आयफोन 14 चं अधिकृत लॉन्चिंग (Iphone 14 Launch) करण्यात आलं आहे. 7 सप्टेंबर 2022 ला ऍपलकडून यावेळचा ऍपलचा ऑफिशियल लॉन्च इव्हेन्ट पार पडला. दरवेळच्या ऍपल इव्हेंटसाठी टेक प्रेमी आणि सोबतच सामान्य लोकांमध्येही प्रचंड उत्सुकता असते. नव्या आयफोनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता कायम शिगेला गेलेली असते. दरम्यान, आज आपण iPhone कसा तयार केला जातो, हा फोन बनवण्याची प्रोसेस काय याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
आकड्यांमध्येच बोलायचं झाल्यास एका सेकंदात कंपनी तब्बल 6 आयफोन बनवते. प्रत्येक फोन तयार करण्यासाठी तब्बल 400 पायऱ्यांची क्लिष्ट प्रोसेस असते. जाणून घेऊयात याच मेकिंग प्रोसेसबाबत.
प्रति सेकंद 6 iPhone होतात तयार
न्यू यॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका दिवसात तब्बल 5 लाख आयफोन बनवले जातात. याचाच अर्थ प्रत्येक मिनिटाला तब्बल 350 आणि प्रत्येक सेकंदाला 6 आयफोनचे युनिट्स बनवले जातात. या संपूर्ण प्रोसेसमध्ये फोनमधील विविध भाग हे तब्बल 200 सप्लायर्सपासून एकत्रित केले जातात. यामध्ये मेमरी चिप, मोडेम, मायक्रोफोन, टचस्क्रीन, कॅमेरा यासारख्या पार्ट्सचा समावेश आहे.
जाणून घेऊयात संपूर्ण याच प्रोसेसबाबत
ऍपल आपल्या जगभरातील सप्लायर्सकडून फोनसाठी लागणारे विविध कॉम्पोनंट्स घेऊन आपल्या मॅनिफॅक्चरर्सला देतो. चीनमध्ये सध्या Foxconn कंपनी ही फोनसाठी लागणारी केसिंग तयार करते. यानंतर आयफोन तयार करण्यासाठी तब्बल 400 स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये विविध भागांची जोडणी, म्हणजेच पॉलिशिंग, सोल्डरिंग, ड्रिलिंग, फिटिंग, पॉलिशिंग यासारख्या पप्रक्रियांचा समावेश आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील ऍपल पार्क मुख्यालयातून आजचा ऍपल कंपनीचा इव्हेन्ट सुरु झाला. यामध्ये आयोफोन सोबतच नवीन आय वॉच, नवीन ऍपल इअरबड्स देखील लॉन्च करण्यात आले.