Apple iPhone : तुम्ही ज्यावेळी एखादा (Mobile) मोबाईल, एखादा स्मार्टफोन खरेदी करता त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या (Mobile features) फिचर्सवर फारच लक्ष देता. फोन जितका Secure तितकीच आपल्या खासगी माहितीच्या गोपनीयतेची हमी इतकं सोपं समीकरण गेल्या काही दिवसांमध्ये दृढ झालं आहे. यासाठी अनेक बड्या कंपन्या फोनच्या वारेमाप किंमतीही आकारू लागल्या आहेत. अशाच महागड्या फोनच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे Apple iPhone. युझर्सना गोपनीयतेची हमी देणारा हाच आयफोन आता मात्र वाईट फसला आहे. का, ते पाहा.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

iPhone तयार करणाऱ्या Apple या कंपनीला पुन्हा एकदा कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्रान्समधील युझर प्रायव्हसी फर्म CNIL नं हा दंड लावला आहे. युजर्सना अॅपलनं पर्सनलाईज्ड जाहिरातींच्या माध्यमातून निशाण्यावर घेतल्याचा आरोप या कंपनीनं लावला आहे. युझर्सच्या तक्रारीनंतर या कंपनीनं अॅपला 8 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 70 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Apple fined Euro 8 5 million in France over targeted Personalized ads in App Store)


संपूर्ण प्रकरण वाचून हादराल 


CNIL कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार (Apple iPhone privacy) अॅपल आयफोनमध्ये असणाऱ्या सेटिंग्जमध्ये (iPhone settings) अॅडवर्टाइजमेंट टार्गेटिंगच्या सेटिंगशी संबंधित एक पर्याय उपलब्ध होता. हा पर्याय फोनमधील डिफॉल्ट सेटिंग्जपैकी एक. पण, डिवाईस फंक्शनसाठी तो अनिवार्य नाही हेसुद्धा लक्षात घेणं अतीव महत्त्वाचं. असं असूनही युझर्सच्या मोबाईलमध्ये डोकावत गोपनीयतेचा धक्का पोहोचवल्याबद्दल अॅपलला हा दंड सुनावण्यात आला आहे. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार फोनमध्ये ही सेटिंग iOS च्या जुन्या (iOS 14) वर्जनमध्ये उपलब्ध होती. 


हेसुद्धा वाचा : Electric vehicle : ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत आता ही सुविधा


युझर्सच्या परवानगीशिवाय अॅपलनं.... 


CNIL च्या माहितीनुसार अॅपलनं युझर्सच्या परवानगीशिवाय फोनमध्ये काही अॅप्सट इन्स्टॉल केले आणि त्यांची ओळख पटवून जाहिरातींच्या माध्यमातून त्यांना निशाण्यावर घेतलं. या गंभीर आरोपानंतर आता अॅपलकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलं. 


अॅपलप्रमाणंच मेटालाही फटका... 


Facebook, WhatsApp, Instagram या सर्वाधिक वापरात असणाऱ्या सोशल नेटव्हर्किंग साईट्सची पॅरेंट कंपनी असणाऱ्या (Meta) मेटा या कंपनीवरही 390 मिलियन युरो म्हणजेच 3500 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन युनियननं मेटावर युझर्सची खासगी माहिती वापरत केलेल्या टार्गेटेड एडवर्टिजमेंटसाठी हा दंड ठोठावला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं होतं.