`या` देशात जगातील पहिलं फ्लोटिंग मोबाईल स्टोर
पाण्यावर तरंगणारं मोबाईल स्टोर...
सिंगापूर : आयफोन बनवणारी टेक्नोलॉजी कंपनी ऍपलने, सिंगापूरमध्ये apple marina bay sands नावाने आपलं पहिलं रिटेल स्टोर सुरु करण्याची घोषणा केली आहे. ऍपलचं हे स्टोर, जगातील पहिलं फ्लोटिंग रिटेल मोबाईल स्टोर असणार आहे. ऍपलने दिलेल्या माहितीनुसार, हे स्टोर एका डोमप्रमाणे दिसत असून आणि पाण्यावर तरंगतं. हे गुरुवारी लोकांसाठी सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.
कंपनीने सांगितलं की, मरीना बे हे सिंगापूरच्या सर्वात आयकॉनिक ठिकाणांपैकी एक असून, ऍपलच्या ग्राहकांनाही हा नवा अनुभव देईल. संपूर्ण काचेपासून तयार करण्यात आलेल्या या स्टोरची रचना सेल्फ सपोर्टेड आहे. यात काचेच्या 114 तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. तसंच स्ट्रक्चरल कनेक्शनसाठी यात 10 narrow vertical mullionsचा वापर करण्यात आला आहे.
या स्टोरचं डिझाइन रोममधील Pantheon पासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलं आहे. या स्टोरमध्ये उपयोग करण्यात आलेलं काचेचं इंटिरिअर custom baffles interior असून, काचेचा प्रत्येक तुकडा अशाप्रकारे लावण्यात आला आहे की, रात्रीच्या प्रकाशाचा चांगला इफेक्ट मिळेल.
या स्टोरमध्ये 150 कर्मचारी असणार आहेत. जे जगातील 23 भाषांमध्ये तज्ज्ञ असतील. या स्टोरमध्ये ऍपलशी संबंधित प्रत्येक वस्तू उपलब्ध करण्यात आली असून त्याशिवाय पर्सनल टेक्निकल सपोर्टही मिळणार आहे.