Apple चे iPhone झाले महाग, एवढी वाढली किंमत
जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही तुमच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे.
मुंबई : जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही तुमच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे.
आता अॅपलच्या फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण कंपनीने भारतमध्ये आपल्या सगळ्या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने या बातमीवर शिक्कामोर्तब केलं असून या किंमती सोमवारपासून वाढ झाली आहे.
हल्लीच भारतीय सरकारने मोबाइल, व्हिडिओ कॅमेरा आणि टीव्हीवर इंपोर्ट टॅक्स वाढवला आहे. यामुळे अॅपल कंपनीने आयफोनच्या किंमतीत ३.५ टक्के वाढ केली असून ही वाढ सोमवारपासून म्हणजे १८ डिसेंबरपासून लागू झाली आहे.
किंमती वाढल्यानंतर iPhone x च्या 256 जीबी मॉडेलची किंमत आता १ लाख ५ हजार ७२० रुपये इतकी झाली आहे. याची किंमत अगोदर १,०२,००० रुपये होती.
iPhone 8 Plus 256 जीबी ची जुनी किंमत ही ८६ हजार होती ती आता ८८ हजरा ७५० रुपये इतकी झाली आहे.
iPhone 7 Plus 128 जीबीची किंमत देखील वाढली असून आता ती ७०,१८० रुपये इतकी झाली आहे.
128 जीबीचा iPhone 6 Plus आता ५९,८६० रुपये इतका आहे
या चार्टवरून जाणून घ्या iPhone च्या सर्व स्मार्टफोनची किंमत