iPhone 15 Sale: अ‍ॅपल कंपनीचा आयफोन 15, 15 Plus, 15 Pro आणि 15 Pro Max मंगळवारी लाँच झाले आहे. आयफोन 15 सीरीजमध्ये असेलेले भन्नाट फिचर्समुळं हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. आज 15 सप्टेंबर 2023 पासून भारतीय ग्राहक आयफोन 15 सीरीजसाठी प्री बुकिंग सुरू करु शकणार आहात. मुंबई आणि दिल्लीत अॅपलचे स्टोअर सुरू झाल्यापासून iPhoneची ही पहिली लाँचिग आहे. त्यामुळं ग्राहक फोन खरेदी करण्यासाठी थेट स्टोअरमधूनही खरेदी करु शकतात. आयफोनचे प्री-बुकिंग आजपासून सुरू होत असले तरी ग्राहक 22 सप्टेंबरपासून खरेदी करु शकणार आहात. आयफोन 15 खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आयफोन 15 च्या काही व्हेरियंटवर मोठी ऑफर्स देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार 15 सप्टेंबरपासून iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, आणि iPhone 15 Pro Max ची प्रीबुकिंग करु शकणार आहात. अॅपलच्या साइटव्यतिरिक्त अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अन्य इ कॉमर्स साइटवरुनही प्री ऑर्डर करु शकता. या स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंटदेखील मिळत आहेत. कोणत्या व्हेरियंटवर किती डिस्काउंट मिळणार आहे, जाणून घ्या. 


iPhone 15, iPhone 15 Plus खरेदी केल्यास अॅपल 5000 रुपयांचे डिस्काउंट देत आहे. मात्र, HDFC बँकेचे कार्ड वापरुन खरेदी केल्यावरच हे डिस्काउंट मिळणार आहे.  iPhone 15 Pro, आणि iPhone 15 Pro Max वरही डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्हाला कंपनीकडून 6000 रुपयांचे डिस्काउंट देण्यात येत आहे. HDFC बँकेच्या कार्डवर ही ऑफर मिळत आहे. 


आयफोन 15 सीरीजची किंमत जाणून घ्या!


iPhone 15 सीरीज तीन व्हेरियंटमध्ये असून ब्लू, पिंक येलो, ग्रीन, ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे


128 जीबी - 79,900 रुपये
256 जीबी - 89,900 रुपये
512 जीबी - 1,09,900 रुपये


​iPhone 15 प्लस


128 जीबी - 89,900 रुपये
256 जीबी - 99,900 रुपये
512 जीबी - 1,19,900 रुपये
 
​iPhone 15 Pro


128 जीबी - 1,34,900 रुपये
256 जीबी - 1,44,900 रुपये
512 जीबी - 1,64,900 रुपये
1 टीबी - 1,84,900 रुपये


iPhone 15 प्रो मॅक्स


256 जीबी - 1,59,900 रुपये
512 जीबी - 1,79,900 रुपये
1 टीबी - 1,99,900 रुपये