नवी दिल्ली : ऍपलने (Apple)आपले दोन नवे ऍपल वॉच सीरिज लॉन्च केले आहेत. कंपनीच्या सीईओ टिम कुकने (Tim Cook) कॅलिफोर्नियातील मुख्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली आहे. कंपनीने ऍपल वॉच सीरिज 6 (Apple Watch Series 6) आणि ऍपल वॉच  SE (Apple Watch SE) लॉन्च केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍपल वॉच सीरिज 6 फिचर्स (Apple Watch Series 6) -


ऍपल वॉच सीरिज 6 मध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटरचं फीचर देण्यात आलं आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स केवळ 15 सेकंदात रक्तातील ऑक्सिजनची पातळी जाणून घेऊ शकतात. 


ऍपल वॉच सीरिज 6, लेटेस्ट वॉच ऑपरेटिंग सिस्टम 7 (watchOS 7) वर काम करते. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याशिवाय कंपनीने या वॉचमध्ये फॅमिली फिचर दिला आहे. ज्याद्वारे यूजर्स आपल्या मुलांच्या ऍपल वॉचला, आपल्या आयफोनच्या मदतीने सेट करु शकतात. यात कॉल नोटिफिकेशनचीही सुविधा देण्यात आली आहे. कंपनीकडून वॉचसोबत सहा वेग-वेगळ्या रंगाचे कलर स्ट्रॅपही देण्यात येणार आहेत.


ऍपल वॉच सीरिजची भारतातील सुरुवातीची किंमत ही 40 हजार 900 रुपये इतकी असेल. 



ऍपल वॉच  SE (Apple Watch SE) -


कंपनीकडून या वॉचमध्ये फॉल डिटेक्शन फिचर देण्यात आलं आहे. हे वॉच स्विम प्रूफ आहे. यात फॅमिली सेटअप, फेस शेअरिंग, स्लिप ट्रॅकिंग यांसारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. हे वॉच सध्या भारतात उपलब्ध नाही. 




याशिवाय कंपनीने ऍपल फिटनेस प्लस (Apple Fitness+) नावाने एक फिटनेस सुविधा सुरु केली आहे, जी ऍपल वॉच यूजर्ससाठी आहे. फिटनेस प्लसमध्ये यूजर्स व्हिडिओ लिस्टमध्ये, अशा वर्कआऊट व्हिडिओची निवड करु शकतात, जे iPhone, iPad, apple TV वर पाहता येतील. त्याशिवाय कंपनीने iPad 8th Gen, iPad Air (2020) आणि Apple One लॉन्च केला आहे.