स्क्रिन साफ करण्यासाठी Appleने लाँच केला खास कपडा; किंमत पाहाच!
आयफोन आणि मॅकबुक प्रो या सर्वांना साफ करण्यासाठी अॅपलने खास कपडा लाँच केला आहे.
मुंबई : लाख रूपयांचा आयफोन, दोन लाखांचा मॅकबुक प्रो आणि या सर्वांना साफ करण्यासाठी अॅपलने खास कपडा लाँच केला आहे. मात्र या कपड्याची किंमत तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला हा कपडा विकत घ्यायचा असेल तर 1900 रूपये मोजावे लागणार आहेत.
अॅपलने एक क्लीनिंग क्लॉथ लाँच केलं आहे, ज्याची किंमत 1900 रुपये आहे. कंपनी त्याला पॉलिशिंग क्लॉथ असं म्हणतात. या क्लॉथच्या माध्यमातून तुम्ही डिस्प्ले आणि नॅनो टेक्सचर ग्लास साफ करू शकणार आहात.
हे फक्त अॅपल उपकरणांसाठी आहे का? मुळात या क्लीनिंग क्लॉथद्वारे तुम्ही कोणतंही गॅझेट किंवा स्क्रीन साफ करू शकता. साधारणपणे सूक्ष्म फायबर क्लॉथचा वापर मोबाईल किंवा कॉप्यूटरची स्क्रीन साफ करण्यासाठी केला जातो. तुम्ही ते बाजारातून 100-200 रुपयांना सहज खरेदी करू शकता.
अॅपल क्लीनिंग क्लॉथ का इतका महाग?
अॅपलने म्हटलं आहे की, हे पॉलिशिंग कापड मऊ नॉन-एबरेसिव मेटेरियलपासून बनवलं गेलं आहे. आणि ते कोणत्याही अॅपल डिस्प्लेला स्वच्छ करू शकतं. यासह, नॅनो टेक्सचर ग्लास सुरक्षिततेसह साफ करता येते.
नॅनो टेक्स्चर्ड ग्लास म्हणजे काय?
अॅपलच्या महागड्या iMacमध्ये नॅनो टेक्सचर्ड स्पेशल कोटिंग देण्यात आलं आहे. अॅपलच्या एक्स्टर्नल डिस्प्लेतही हे कोटिंग उपलब्ध आहे. या स्क्रिनवर स्क्रॅच पडण्याची भीती असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही नॅनो टेक्सचर अॅपल प्रो एक्सडीआर डिस्प्ले विकत घ्यायला गेलात, तर त्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. या प्रकरणात, हे अॅपल पॉलिशिंग कापड आपल्यासाठी आहे. कारण एवढे पैसे गुंतवून, जर तुम्ही ते कोणत्याही स्क्रॅचशिवाय स्वच्छ केलं तर ती चांगली गोष्ट आहे.
दुसरीकडे लोक सोशल मीडियावर, विशेषत: ट्विटरवरही याची खिल्ली उडवत आहेत. या कापडावर अॅपलचा लोगो आहे की नाही, किंवा कोणत्या वेळी तो अपग्रेड करावा लागेल, अशा प्रकारे लोकं मस्करी करत आहेत.