Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?
Apple Warranty Check: अॅपल कंपनीने त्यांच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळं आता ग्राहकांच्या खिशाचा भार वाढणार आहे.
Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या महिन्यात iPhone आणि Apple Watchसाठी पॉलिसी अपडेट केली आहे. या अपडेटनंतर कंपनी सिंगल हेअरलाइन क्रॅक स्टँडर्ड वॉरंटीमध्ये कव्हर करणार नाही. पहिले अॅपल Watch आणि iphoneवर सिंगल हेअरलाइन क्रॅक झाल्यास त्यावर स्टँडर्ड वॉरंटी मिळत होती. मात्र, आता कंपनीने मोठे बदल केले आहेत.
वॉरंटीसाठी डिव्हाइसवर फिजिकल डॅमेजचे इतर कोणते निशाण नसावेत. या वॉरंटीचा अर्थ जर तुमच्या फोनमध्ये किंवा वॉचमध्ये थोडासा क्रॅक असेल तर ते फ्रीमध्ये वॉरंटीअंतर्गंत दुरुस्त करण्यात येत होते. मात्र, आता अॅपलने त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. जर तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणताही क्रॅक असेल तर ते वॉरंटीमध्ये कव्हर केले जाणार नाही. तर, या प्रकारचे क्रॅक अॅक्सिडेंटल डॅमेजअंतर्गंत ठिक केले जातील. म्हणजेच तुम्हाला ते रिपेअर करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.
या पॉलिसीची माहिती अॅपल स्टोर आणि अॅपल ऑथराइज्ड सर्व्हिस प्रोव्हायडरला एक आठवड्याआधी देण्यात आली होती. सर्व्हिस सेंटर आता डिव्हाइसवर सिंगल क्रॅक असल्यास अॅक्सिडेंट डॅमेजच्या अतंर्गंत ठिक करु शकतात. त्यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत.
मात्र, iPads आणि Macsच्या वॉरंटीवर अद्याप सिंगल हेअरलाइन क्रॅक कव्हर केले जात आहे. अॅपलने त्यांच्या पॉलिसीत का बदल केले याचे कारण मात्र अद्याप सांगितलेले नाहीयेत. हा बदल खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. कारण त्यांना साध्याशा क्रॅकसाठीही पैसे खर्च करावे लागणार आहेत. जे आधी वॉरंटीमध्ये कव्हर होत होते.
दरम्यान, Appleच्या वेबसाइटवर तुम्हाला स्क्रीन रिप्लेसमेंटची माहिती देखील मिळणार आहे. त्यामुळं जर तुम्ही अॅपलचं एखादं डिव्हाइस खरेदी करत असाल तर Apple Protection Plus देखील खरेदी कराल. ही अॅपलची एक्सटेंडेड वॉरंटी आहे. ज्यात अॅस्किडेंटल क्रॅकदेखील कव्हर केले जात आहेत. मात्र, त्यासाठी काही अटीदेखील लावण्यात आलेल्या आहेत.