मुंबई : स्मार्ट उपकरणांमुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे. ज्यामुळे सध्या लोकं अशा स्मार्ट गोष्टीकडे वळत आहे, मग ते वॉच असू देत, फ्रिज असूदे, वॉशिंग मशिन असू दे किंवा स्पीकर असू देत. लोक आता सगळ स्मार्टच गोष्टी मागू लागल्या आहेत. काही स्मार्ट गॅजेट्स देखील आले आहेत, जे लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वापरले जातात. Apple वॉच बद्दल अनेक अहवाल आले आहेत, जिथे लोकांचे जीव वाचवले आहेत. असेच एक प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. सिंगापूरमध्ये दुचाकी चालवताना एका तरुणाचा अपघात झाला. रस्त्यावर पडताच तो बेशुद्ध झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी इतर कोणीही तिथे उपस्थित नव्हते. अशा वेळा Apple वॉचच्या मदतीने त्याचा जिव वाचला आहे. हा वॉच सक्रिय झाला, ज्यामुळे ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली गेली.


अपघात कसा झाला?


मोहम्मद फिट्री नावाचा मोटरसायकलस्वार आंग मो कीओमध्ये एका व्हॅनला धडकल्यानंतर त्याची दुचाकीवरून खाली पडली. दुचाकी स्वाराने मीडियाशी बोलताना सांगितले की, त्याने बेशुद्ध होण्यापूर्वी हे पाहिले की, वॅन त्याला टक्कर मारुन सुसाट पळून गेली. रस्त्यावर कोणी नसल्याने त्याला मदत करण्याचे चान्सेस देखील कमी आहेत.


अहवालानुसार, हा अपघात 25 सप्टेंबरच्या संध्याकाळी आंग मो किओ एव्हेन्यू 6 आणि आंग मो किओ स्ट्रीट 31 च्या जंक्शनवर झाला. पोलिसांनी या घटनेचे वर्णन हिट अँड रन असे केले आहे. या अपघाताविषयी अधिक माहिती आणि प्रत्यक्षदर्शींचा शोध पोलीस आणि त्याचे कुटुंबीयही घेत आहे.


स्मार्ट वॉच आपत्कालीन संपर्कांना सतर्क करते
फितरीने सांगितले की, त्याच्या Apple स्मार्ट वॉचला हार्ट फॉलबद्दल समजले असता त्याने आपातकालीन संपर्कांना संदेश पाठवला. ज्यामझ्ये त्याच्या गर्लफ्रेंडलाही अलर्ट मिळाला. स्मार्ट घड्याळाने रुग्णवाहिकेचीही मागणी केली.


ताबडतोब रुग्णालयात नेले


फितरीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, या जीवनरक्षक कार्यासाठी ते खूप आभारी आहेत, कारण त्यावेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. जर Apple वॉचने कॉल केला नसता, तर त्याचा मृत्यू होऊ शकला असता. जेव्हा पॅरामेडिक्स घटनास्थळी पोहोचले तेव्हा फितरीला हळूहळू शुद्ध आली. सिंगापूर सिव्हिल डिफेन्स फोर्सने (एससीडीएफ) सांगितले की, त्यांना रात्री 8:20 च्या सुमारास अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर फितरीला खु टेक पुआट रुग्णालयात नेण्यात आले.


Apple च्या मते, सीरीज 4 किंवा नंतरचे मॉडेल हार्ड फॉल्स शोधू शकतात. जेव्हा एखादा हार्ट फॉल त्यांना आढळतो, तेव्हा ते वापरकर्त्याला त्यांच्या मनगटावर टॅप करण्याची, अलार्म वाजवण्याची आणि अलर्ट प्रदर्शित करण्याची अनुमती देईल. जर वापरकर्त्याने कोणतीही हालचाल केली तर तो आपत्कालीन क्रमांकाशी संपर्क साधत नाही. जर वापरकर्त्याने कमीतकमी एका मिनिटासाठी कोणतीही हालचाल केली नाही, तर स्मार्ट घड्याळ आपत्कालीन कॉन्टॅक्शी संपर्क साधते.