सियोल : सॅमसंग २०१८ मध्ये फोल्डेबल स्मार्टफोन 'गॅलॅक्सी एक्स' लॉन्च करणार असल्याचं समजतं. तर अॅपल आणि एलजी डिसप्ले हे एकत्रितपणे असलेला फोल्डेबल आयफोन बनवण्याच्या तयारीत आहे. कोरियाच्या वेबसाईट इन्व्हेस्टरच्या रिपोर्टनुसार, अप्पलने सॅमसंग ऐवजी एलजी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. फोनचे डिजाईन लीक होण्याची भीती अप्पलला होती. रिपोर्टनुसार 'द बेल च्या नुसार एलजीने नव्या मॉडेलसाठी फोल्डेबल ओएलईडी स्क्रीन बनवण्यासाठी टास्क फोर्सचे संघटन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोल्डेबल आयफोनचे पॅनल प्रॉडक्शन २०२० पासून सुरु होईल. एलजी ने तात्पुरते ओएलईडी पॅनल प्रोटोटाईप पूर्ण केले आहे. कंपनीने अलीकडेच पहिल्या ओएलईडी चे प्रॉडक्शन सुरु ले केले आहे. 


याचदरम्यान सॅमसंग पहिल्या ओएलईडी आयफोन एक्स साठी पॅनल पाठवणे सुरु केले आहे. रिपोर्टमध्ये पुढे असे सांगण्यात आले आहे की, ओएलईडी उत्पादनामध्ये सॅमसंगचा असलेला एकाधिकाराला छेद देत अॅपल एलजी डिस्प्ले आपली भागीदारी भक्कम करत आहे.