iPhone 13 Price cut announced in India: Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असलं तरीही काहीजणांना हा फोन अवाक्याबाहेरचा वाटत आहे. पण, निराश होण्याचं कारण नाही. कारण, 14 नाही तर तुम्ही iPhone 13 तर नक्कीच घेऊ शकता. सध्या हा फोन भारतात 69,900 इतकी झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विविध ऑफर्स जोडल्या असता ही किंमत 10 हजारांपर्यंत कमी झाल्याचं लक्षात येत आहे. 


Amazon आणि Flipkart यांसारख्या ई कॉमर्स साईट्सवर आयफोन 13 वर बऱ्याच सवलतीही देण्यात येत आहेत. जिथं तुम्हाला या फोनच्या किमतीत 15 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळेल. 


Apple Event 2022: iPhone 14 सिरीज झाली लॉन्च, जाणून घ्या फोनबाबत सर्वकाही


iPhone 13, iPhone 13 mini price in India
iPhone 13 mini 128GB – Rs 64,900
iPhone 13 mini 256GB – Rs 74,900
iPhone 13 mini 512GB – Rs 94,900
iPhone 13 128GB – Rs 69,900
iPhone 13 256GB – Rs 79,900
iPhone 13 512GB – Rs 99,900


Apple नं भारतात  iPhone 12 च्या किमतीही कमी केल्या आहेत. आता हा फोन 59,900 रुपयांपासून उपलब्ध आहे. तर iPhone 12 मिनी व्हर्जनचं मॉडेल बंद करण्यात आलं आहे. iPhone 12 दोन वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता.