Laptop घ्यायचाय? Asus चे `हे` लॅपटॉप्स ठरतील बेस्ट पर्याय; किंमतही अगदी परवडणारी...
Asus कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम दर्जाचे अधुनिक टेक्नोलॉजीचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. जर तुम्हाला स्मार्ट फीचर्स असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही या लॅपटॉप्सचा नक्कीच विचार करायला हवा.
Asus laptops launched in India : Asus कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम दर्जाचे अधुनिक टेक्नोलॉजीचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. यामध्ये Asus ProArt Studiobook Pro 16 OLED (W7600), Asus ProArt Studiobook 16 OLED (H7600) आणि Asus Vivobook Pro 16X OLED (N7601) आणि Asus Vivobook Pro 15 OLED (K6500/M6500) या लॅपटॉप्सचा समावेश आहे. जर तुम्हाला स्मार्ट फीचर्स असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही या लॅपटॉप्सचा नक्कीच विचार करायला हवा.
Asus Vivobook Pro 16X OLED (N7601)
Pro 16X OLED मध्ये 16-इंचाचा 4K OLED डिस्प्ले आहे. 12th Generation Intel Core i9-12900H प्रोसेसरने सुसज्ज आहे तर 32GB पर्यंत RAM आहे. या लॅपटॉपमध्ये 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. लॅपटॉपमध्ये FHD वेबकॅम, हरमन कार्डन स्पीकर आणि फिंगरप्रिंट स्कॅनर सारखी अनेक फीचर्स दिले आहेत. त्याचबरोबर, यात 140W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी देण्यात आली आहे.
Asus Vivobook Pro 15 OLED (K6500/M6500)
Vivobook Pro 15 OLED (K6500/M6500) या लॅपटॉपमध्ये 12th Generation Intel Core i7-12650H प्रोसेसर आहे, 16GB पर्यंत RAM आहे. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD OLED डिस्प्ले आहे. डिव्हाइसमध्ये 1TB पर्यंतचे स्टोरेज दिले गेले आहे. लॅपटॉपमध्ये FHD वेबकॅम, हरमन कार्डन स्पीकर आणि फिंगरप्रिंट स्कॅनर सारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, यात 140W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी देण्यात आली आहे. Vivobook Pro 15 OLED या लॅपटॉपची किंमत 89,990 रुपये आहे.
Asus ProArt Studiobook Pro 16 OLED Laptop
ProArt Studiobook 16 OLED हा लॅपटॉप 12th Generation Intel Core i9-12900H आणि i7-12700H या दोन प्रोसेसरच्या ऑप्शन्समध्ये खरेदी करता येतो. या लॅपटॉपमध्ये 16-इंचाचा 4K OLED HDR डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये 2 + 2 TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. त्याचबरोबर, 2 SO-DIMM स्लॉट दिले आहेत, जे 64 GB पर्यंत 4800 MT/s DDR5 RAM ला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी, या लॅपटॉपला Thunderbolt 4 पोर्ट, 2 USB 3.2 Gen 2 Type-A पोर्ट, HDMI 2.1 आणि SD Express 7.0 कार्ड रीडर सारखे ऑप्शन्स मिळतात. StudioBook Pro 16 OLED (W7600) या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 3,29,990 रुपये आहे.
Asus ProArt Studiobook 16 OLED Laptop
Asus ProArt Studiobook Pro 16 OLED मध्ये 12th Gen Intel i9-12900 प्रोसेसर आहे. तसेच लॅपटॉप 12GB VRAM ने सुसज्ज आहे. या लॅपटॉपमध्ये 16-इंचाचा 4K OLED HDR डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये 2 + 2 TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. त्याचबरोबर, 2 SO-DIMM स्लॉट दिले आहेत, जे 64 GB पर्यंत 4800 MT/s DDR5 RAM ला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी, या लॅपटॉपला Thunderbolt 4 पोर्ट, 2 USB 3.2 Gen 2 Type-A पोर्ट, HDMI 2.1 आणि SD Express 7.0 कार्ड रीडर सारखे ऑप्शन्स मिळतात. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, Studiobook 16 OLED (H7600) हा लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1,99,990 रुपये आहे.