नवी दिल्ली :  तरूणांमध्ये कायम नव-नवीन मोबाईलचं आकर्षण असतं. तर मोबाईल प्रेमींची उत्सूकता वाढवण्यासाठी  Asus कंपनीने नवीन फोन भारतात लाँच  केला आहे. ROG phone 5 या सीरिजमधील तीन मोबाईल भारतात लाँच केले आहेत. Asus कंपनीने ROG Phone 5, ROG Phone 5 pro आणि ROG 5 Ultimate मोबाईल भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. या मोबाईलमधील खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये 18GB रॅम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Asus ROG phone 5 मोबाईलची किंमत
Asus ROG phone 5च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत  49 हजार 999 रूपये इतकी आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या फोनसाठी 57 हजार 999 रूपये मोजावे लागणार आहे. 


त्याचप्रमाणे Asus ROG phone 5 proमोबईलमध्ये 16 GB रॅम आणि 512GB स्टोरेजसाठी 69 हजार 999 रूपये मोजावे लागणार आहे. सोबतच  ROG 5 Ultimateमोबाईल मध्ये 18GB रॅम आणि 512GB स्टोरेजसाठी 79 हजार 999 रूपये आहे. 



Asusकंपनीचे हे तीन  फोन iphoneला टक्कर देणारे ठरणार आहेत. Asus कंपनीचे फोन गेमिंगसाठी फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता Asusकंपनीच्या या मोबाईला भारतीय बाजारात मोठी मागणी मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही.


Asus ROG Phone 5 स्पेसिफिकेशन
- Asus ROG phone 5 मोबाईलमध्ये 6.78 इंच आणि फुल एचडी आणि AMOLED डिसप्ले देण्यात आलं आहे. 
- मोबाईलचे रिजॉल्यूशन  1,080x2,448 पिक्सल आहे. 
- या फोनमध्ये सर्वात जास्त 18 GB रॅम आहे.
- फोनमध्ये इंटरनल स्टोरेज 512 GB आहे.