मुंबई : एटीम कार्डाचा उपयोग काय ? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच त्याचे उत्तर केवळ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि पैसे काढण्यासाठी इतकाच होतो. परंतू यापलिकडे  एटीएम कार्डचा नेमका उपयोग काय ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


एक्सिडेंटल इन्शुअरन्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी किंवा प्राईव्हेट बॅंकांमध्ये एटीएम कार्डवर तुम्हांला एक्सिडेंटल इन्शुअरन्स देखील मिळतो. दुर्घटना झाल्यानंतर संबंधित बॅंकांकडून तुम्हांला इन्श्युरंस मिळतो. अनेकांचा एटीएम कार्डाच्या या सुविधेबाबत फार माहिती नसते.   


एटीएम कार्डाचा इन्श्युरंस  


सरकारी आणि प्रायव्हेट बॅंकांमध्येही एटीएम कार्डावर एक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन कव्हर असतो. सोबतच एक्सिंडेंटल डेथ कव्हर दिला जातो. या इन्श्युरंस अंतर्गत ५० हजार रूपयांपासून १० लाख रूपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. ज्यांची बॅंकांमध्ये अ‍ॅक्टीव्ह अकाऊंट असतात त्यांनाच हा फायदा घेता येऊ शकतो.  


कसा घ्यावा क्लेम  


एटीएम इन्श्युरंस क्लेमसाठी  एटीएम धारकाला २-५ महिन्यांमध्ये क्ल्मेम करणं आवश्यक आहे.  एक्सिडेंटल डेथ असल्यास, ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या बॅंक ब्रांचमध्ये २-५ महिन्यांच्या आतामध्ये अ‍ॅप्लिकेशन देणं गरजेचे आहे.  
मृत व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये मागील ६० दिवसांमध्ये काही व्यवहार झाले आहेत का ? याबाबतची तपासणी बॅंकांकडूनही केली जाते.  
इन्शुरंसमध्ये अपंगत्वापासून मृत्यूपर्यंत वेग वेगळी मदत केली जाते.  


विमाची रक्कम किती ? हे कसे जाणून घ्याल  ? 


साधं एटीम, मास्टरकार्‍ड, क्लासिक एटीएम यावर वेगवेगळी रक्कम मिळते. बॅंकेमध्ये त्याची विचारणा केल्यानंतर माहिती मिळू शकते. श्रेणीनुसार रक्कम वेगवेगळी असू शकते. त्यामुळे नेमकी कोणती कागदपत्र हवीत याबबातही माहिती बॅंक देते. 


क्लेमसाठी डॉक्युमेंटशन  


कोणतीही दुर्घटना झाल्यानंतर प्रथम पोलिसांना त्याची माहिती द्यावी. पोलिस रिपोर्टमध्ये  अपघाताचे तपशील दिले जातात. मेडिकल डॉक्युमेंट्स, पोस्टमार्टम रिपोर्ट्स, पोलिस रिपोर्ट, डेथ सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.