मुंबई : आपले सध्याचे जीवनमान धावपळीचे आहे. आपण सतत घाईत असतो. त्याच गडबडीत आपण एटीएममध्ये जातो आणि पैसे काढून बाहेर येतो. मात्र आपली ही घाई आपल्यासाठी घातक ठरू शकते. कारण काही सेकंदातच एटीएम कार्डचे डीटेल्सच नाही तर पासवर्ड देखील इतरांपर्यंत पोहचू शकतो.


काय केले जाते नेमके ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्हिडीओत यासंबंधीत सर्व माहीती दिली आहे. त्यात असे सांगितले आहे की, आपण कार्ड ज्याठिकाणी इन्सर्ट करतो त्यात आतमध्ये चिप फिट केलेली असते. त्या चिपमध्ये कार्डचे डीटेल्स आपोआप सेव्ह होतात. या बॉक्सला चोर अगदी सहज एटीएम मशीनमध्ये लावू शकतात. 
इतकंच नाही तर एटीएम रूममधील कॅमेरा खालच्या दिेशेने फिरवून तुमचा पासवर्ड जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. 


व्हिडिओ 


सावधगिरी न बाळगल्यास तुम्ही लुटमारीचे बळी होऊ शकता. सजग राहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.