Auto Expo : मारूतीने लॉन्च केली धमाकेदार थर्ड जनरेशन स्विफ्ट
मध्यम वर्गींयांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीच्या स्विफ्टचं नवं मॉडेल लॉन्च झालं आहे. मारूतीने ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही कार लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली : मध्यम वर्गींयांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीच्या स्विफ्टचं नवं मॉडेल लॉन्च झालं आहे. मारूतीने ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही कार लॉन्च केली आहे. नवीन स्विफ्टचं हे थर्ड जनरेशन मॉडेल आहे. पण कंपनीने ही कार 5th जनरेशन HAERTECT प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.
६ व्हेरिएंटमध्ये येणार स्विफ्ट २०१८
मारूती डिझायरसारखेच नव्या स्विफ्टचे ६ व्हेरिएंट उपलब्ध होणार आहेत. यात स्विफ्ट LXI, स्विफ्ट VXI, स्विफ्ट VXI AMT, स्विफ्ट ZXI, स्विफ्ट ZXI AMT, स्विफ्ट ZXI+ यांचा समावेश आहे. आणि डीझेल मध्येही सहा व्हेरिएंटचा समावेश आहे. त्यात स्विफ्ट LD, स्विफ्ट VDI, स्विफ्ट VDI AMT, स्विफ्ट ZDI, स्विफ्ट ZDI AMT, स्विफ्ट ZDI+ यांचा समावेश आहे.
किती असेल मायलेज?
नव्या स्विफ्टच्या पेट्रोल व्हेरिंटचा मायलेज २२ किमी प्रति लिटर होईल. तर डिझेल व्हेरिएंटमध्ये २८.४ किमी प्रति लिटरचा मायलेज मिळणार आहे.
पेट्रोल आणि डिझेल इंजिन
कारमध्ये १.२ लिटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे ८३ पीएसची पॉवर आणि ११३एनएमचा टार्क जनरेट करतं. त्यासोबतच यात ५ स्पीड मॅन्युअल आणि AMTची सुविधा आहे. तेच डिझेल मॉडेलमध्ये १.३ लिटरचं डिझेल इंजिन देण्यात आलंय. जे ७५ पीएसची पॉवर आणि १९० एनएमचा टार्क जनरेट केला जातो. डिझेल मॉडेलमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि AMT ची सुविधा असेल.
जबरदस्त फिचर्स
नव्या स्विफ्टमध्ये डे-टाईम रनिंग एलईडी लाईट, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, लेदरचं स्टीअरींग व्हील, ऑटो हेडलॅम्प्स, पूश-बटन स्टार्ट, स्मार्ट की, ऑटो क्लायमेट कंट्रोलसारखे फिचर्स मिळतील.
६ स्पीकरची साऊंड सिस्टीम
म्युझिक लव्हर्ससाठी कारमध्ये ६ स्पीकर्स असलेली साऊंड सिस्टीम दिली गेली आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंट Z Plus मध्ये अॅन्ड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले आणि मिररलिंक कनेक्टिव्हीटी सपोर्ट करणारी ७.० इंचाची स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिली आहे.
स्टॅंडर्ड सेफ्टी फिचर्स
सुरक्षेसाठी मारूती सुझुकीने नव्या स्विफ्टमध्ये अॅन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडीसोबत ब्रेक असिस्ट, ड्यूल एअरबॅग आणि आयएसओफिक्स चाईल्ड सीट अॅंकर सारखे फिचर्स दिले आहेत.
किती असेल किंमत?
सर्वात खास बाब म्हणजे या कारची किंमत किती असेल याकडे सर्वांच्या नजरा होत्या. कंपनीने या कारची सुरूवातीची किंमत ४.९९ लाख रूपये ठेवली आहे. मारूतीने स्विफ्टची रूंदी आणि व्हीलबेसमध्ये वाढ केली आहे. कॅबिनमध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत अधिक स्पेस दिली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन स्विफ्ट आता ४० एमएम जास्त रूंदी केली आहे.