Mahindra Cars : कार खरेदी करण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा त्या कारमधील आसनक्षमता अर्थात कारमध्ये एकाच वेळी कितीजणांना प्रवास करता येणार हाच अनेकांना पडलेला प्रश्न असतो. नवी कार खरेदी करायची म्हटलं की, त्या कारच्या मायलेज आणि इंजिनपासून तिच्या रंगापर्यंत अनेक घटकांची चाचपणी होते, मतमतांतरं आणि कुटुंबातील सदस्यांचं प्राधान्य लक्षात घेतलं जातं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं निरीक्षण असतं ते म्हणजे कारचा वापर आणि रस्त्यांची स्थिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील विविध भागांमध्ये विविध भौगोलिक रचनांनुसार असणारे रस्ते पाहता देशात अनेक कारप्रेमींची पसंती असते ती म्हणजे Mahindra च्या कारना. काळानुरूप इंजिन आणि डिझाईनमध्ये महत्त्वाचे बदल करत महिंद्राकडून सातत्यानं स्पर्धेत असणाऱ्या इतर कंपन्यांच्या कारना टक्कर देण्यात आली. अशा या कंपनीनं आता म्हणे 7 प्रवासी क्षमता असणाऱ्या एका कारच्या दरात चक्क 2 लाख रुपयांची घट केली आहे. 


स्पोर्ट युटीलिटी वेहिकल (SUV) निर्मात्या महिंद्राकडून 2021 मध्ये xuv700 ही कार लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या मॉडेलच्या साधारण 2 लाख युनिटची विक्री झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. लक्षवेधी डिझाईन, दमदार परफॉर्मन्स आणि अद्ययावत फिचर्सची जोड असणाऱ्या या कारची वाहवा होत असतानाच इथं महिंद्रानं आता एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण, कारचं यश साजरा करत कंपनीकडून त्याचं टॉप मॉडेल AX7 ची किंमत लाखोंच्या फरकानं कमी करण्यात आली आहे. 


आता किती रुपये मोजावे लागणार? 


इथून पुढं mahindra xuv700 ax7 साठी कार खरेदी करू पाहणाऱ्यांना 19.49 लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे. याआधी ही कार 21.29 लाख रुपये इतक्या किमतीत उपलब्ध होती. थोडक्यात आता या 7 सीटर कारवर तब्बल 1.80 लाख आणि वरून आणखी काही सवलती मिळून साधारण 2 लाखांची घसघशीत सूट मिळत आहे.


हेसुद्धा वाचा : 'या' दुचाकींसमोर चारचाकीही पडतील फिक्या; खरेदीच्या विचारात असाल तर 'हे' पर्याय ठरतील लाखात एक


 


फक्त ही 7 सीटर कारच नव्हे, तर महिंद्राकडून ax7 च्या 6 सीटर मॉडेलचे दरही 1.75 लाख रुपयांनी कमी करण्यात आले असून, या कारची किंमत 21.44 लाखांवरून 19.69 लाख रुपयांवर पोहोचली आहे. महिंद्राकडून सर्वात मोठी घट ही mahindra xuv700 ax7, च्या 7 सीटर ऑल व्हील ड्राईव्ह डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटवर देण्यात आली असून, हे दर 24.99 लाखांवरून 22.80 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. याच व्हेरिएंटच्या ऑटेमॅटिक व्हेरिएंटची किंमत 26.99 लाख रुपयांवरून 24.99 लाख रुपये इतकी करत इथं 2 लाखांची सूट मिळत आहे.