World of Statistics Report : नविन कार (New Car) घेण्याआधी आपण त्यावर बराच अभ्यास करतो. कोणत्या कंपनीची कार घ्यायची, पेट्रोल, डिझेल की सीएनजी असावी, तिचा अॅव्हरेज काय आहे, आपल्या बजेटमध्ये बसते का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या रंगाची कार घ्यायची. काही जणांना सफेद रंगाची (White) कार जास्त आवडते. काही जण काळ्या रंगाच्या (Black Color) तर काही जणं गडद रंगाच्या कारला अधिक पसंती देतात. पण तुम्हाला कोणी सांगितलं की काळ्या रंगाच्या कारला अपघाताचा जास्त धोका असतो, तर तुम्ही म्हणाल हे काय लॉजिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या रंगाच्या कारला अपघाताचा धोका?
हे आम्ही म्हणत नाही, तर World of Statistics चा अहवाल आहे. या अहवालानुसार काळ्या रंगाच्या कारला अपघाताचा धोका 47 टक्के इतका आहे. राखाडी रंगाच्या कारला 11 टक्के, सिल्व्हर रंगाच्या कारला 10 टक्के, लाल रंगाच्या कारला 7 टक्के अघाताचा धोका आहे. World of Statistics ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. 


कोणत्या रंगाच्या कारना अपघाताचा सर्वात कमी धोका आहे, यावर या अहवालात सफेद रंगाला सर्वात वरचं स्थान देण्यात आलं आहे. म्हणजे सफेद रंगाच्या कारना अपघाताचा धोका कमी असतो, यानंतर पिवळा, नारंगी आणि सोनेरी रंगाच्या गाड्यांचं नंबर लागतो, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 


आनंद महिंद्रा यांनी दिलं उत्तर
World of Statistics च्या अहवालावर प्रतिक्रिया देताना महिंदा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी अहवालातील ही माहिती निव्वळ खोटी असल्याचं म्हटलं आहे. ही माहिती चुकीची असल्याचं म्हणत खोटेपणामुळे आपल्याला विचार करायला भाग पाडलं असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. 



या अहवालाचा आम्हीही पाठिंबा देत नाही, पण भारतात कार खरेदी करणाऱ्या 10 लोकांमध्ये  लोकं सफेद रंगाची कार विकत घेतात हेही तितकच खरं आहे. BASF च्या Color Report 2021 for Automotive OEM Coatings च्या अहवालानुसार भारतात 40 टक्के लोक सफेद रंगाच्या कारला पसंती देता. त्यानंतर 15 टक्के लोकं राखाडी रंगाची कार विकत घेतात.