Maruti Wagon :  कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या कारला ग्राहक सर्वाधिक पसंती देत आहेत. यामुळेच भारतीय बाजारपेठेत SUV सेगमेंटच्या वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. हॅचबॅक कारच्या विक्रीत Maruti कंपनी आघाडीवर आहे. मारुती कंपनीच्या स्वस्तात मस्त कार्सचा मार्केटमध्ये  मोठा दबदबा पहायला मिळत आहे. मारुतीच्या कार 34Km इतका मायलेज देत आहे. 5.54 लाखाच्या दरात या कार उपलब्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती वॅगनआर, मारुती स्विफ्ट आणि  मारुती बलेनो या तीन हॅचबॅकच्या कारची जोरदार बुकींग होत आहे. 5.54 ते 6.61 लाख असा प्राईज रेंजमध्ये असलेल्या कार्समध्ये बेस्ट फिचर्स पहायला मिळतात. मायलेजच्या बाबतीही या कार इतर कार पेक्षा सरस ठरत आहेत. मारुती वॅगनआर ही सर्वात बेस्ट सेलिंग कार आहे. 


मारुती वॅगनआर


मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. विशिष्ट बॉक्सी डिझाइनसाठी ही कार प्रसिद्ध आहे. एप्रिल महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण 20,879 युनिट्सची विक्री केली आहे.  दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह ही कार लाँच करण्यात आली आहे. एका व्हेरियंटमध्ये 1.0-लिटर क्षमतेचे इंजिन आहे तर दुसर्‍या प्रकारात 1.2-लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे. या करामध्ये 5-स्पीड इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे. CNG व्हेरिएंटमध्ये देखील ही कार उपलब्ध आहे. पेट्रोल मध्ये ही कार 23.56 किमी इतका मायलेज देते. तर,  CNG प्रकार 34.05 किमी मायलेज मिळेत. या कारची किंमत 5.54 लाख ते 7.42 लाख रुपये  इतकी आहे. 


मारुती स्विफ्ट


मारुती स्विफ्ट ही देखील सर्वात लोकप्रिय कार आहे. कंपनीने स्विफ्टच्या एकूण 18,573 युनिट्सची विक्री केली आहे. मारुती स्विफ्ट ही देशातील दुसरी सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. मारुती स्विफ्ट चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यात 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 90PS चा पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही प्रकारात ही कार उपलब्ध आहे.  पेट्रोल मॉडेल 22 किमी आणि सीएनजी मॉडेल 30 किमी मायलेज देते. 6.00 लाख ते  9.03 लाख असा रेंजमध्ये ही कार उपब्ध आहे. 


मारुती बलेनो


मारुती बलेनो ही एकमेव प्रीमियम हॅचबॅक कार आहे. गेल्या एप्रिल महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण 16,180 युनिट्सची विक्री केली होती. या कारमध्ये 1.2 लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. यात 12 व्होल्ट माईल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे. या कारचे इंजिन 89Bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिनसोबत ही कार CNG प्रकारातही उपलब्ध आहे. याचे पेट्रोल व्हेरियंट 22.35 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते आणि सीएनजी व्हेरिएंट  30.61 किमी/किलोपर्यंत मायलेज देते. 6.61 लाख ते  9.88 लाख रुपये आहे.