मुंबई : डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांचा कल आता सीएनजीकडे वळत आहे. कार विकत घेताना आता ग्राहक सिएनजी बसवलेली कार घेण्यासाठी सरसावले आहेत. खरं तर, सीएनजी कार केवळ किंमतीत स्वस्त नाही, तर त्यात पैशाची अधिक बचत देखील आहे. सीएनजी कारवर एक किलोमीटरचा खर्च सुमारे 2 ते 3 रुपये येतो, जे डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत जवळजवळ अर्ध्या किंमतीपेक्षा कमीच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत, जर तुमचं बजेट 7.5 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल आणि तुम्ही नवीन आणि उत्तम फीचर असलेली  सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला अशा 5 सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी किंमती आणि बचत या दोन्ही बाबतीत योग्य असतील.


Hyundai Santro CNG


Hyundai Santro ही भारतातील सर्वात प्रसिद्ध कारांपैकी एक आहे आणि काही वर्षापूर्वीच याकंपनीने भारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. ज्याचे सीएनजी मॉडेल देखील कंपनीने देशात सादर केले आहे. ह्युंदाई सँट्रोच्या सीएनजी मॉडेलची सुरुवातीची किंमत 5.84 लाख रुपये आहे, जी जास्तीत जास्त 6.20 लाख रुपयांपर्यंत जाते. ही भारतीय बाजारात दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.


यात Magna आणि Sportz अशा दोन प्रकारांचा समावेश आहे. यात पॉवरसाठी 1086 सीसी इंजिन आहे. जे 5500 rpmवर जास्तीत जास्त 59.17 HP आणि 4500 आरपीएमवर 85.31 NMचे पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.


Maruti Suzuki Alto


Maruti Suzukiच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक अल्टोचे सीएनजी मॉडेल देखील बाजारात उपलब्ध आहे. ज्याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 4.56 लाख ते 4.60 लाख रुपये आहे. या परवडणाऱ्या किंमतीसह कंपनीने 0.8-लिटर इंजिन बसवले आहे जे 39.45 बीएचपी पॉवर आणि 60 NM पीक टॉर्क तयार करते.


पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत, सीएनजी व्हेरिएंट 22.05 kmplच्या तुलनेत 31.59 किमी/किलो मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो सीएनजी भारतीय बाजारात फक्त दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - LXI आणि LXI(O)


Hyundai Grand i10 Nios CNG


Hyundai Grand i10 Nios चे सीएनजी मॉडेल दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात Magn आणि Sportz यांचा समावेश आहे. भारतीय बाजारात त्यांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.64 लाख रुपये आहे, जी 7.18 लाख रुपयांपर्यंत जाते. यात पॉवरसाठी 1197 सीसी इंजिन आहे, जे 6000 rpmवर 68 HP जास्तीत जास्त पॉवर आणि 4000 rpmवर 95.12 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.


Maruti Wagon R CNG


मारुती सुझुकी Wagon R बर्‍याच काळापासून ब्रँडच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारांपैकी एक आहे आणि या हॅचबॅकच्या सीएनजी मॉडेलची मागणीही बाजारात चांगली आहे. मारुती सुझुकीच्या WagonR चे CNG मॉडेल LXI आणि LXI (O) प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 5.25 लाख रुपये आहे, जी 5.32 लाख रुपयांपर्यंत जाते.


पॉवरसाठी, 1.0-लीटर तीन-सिलेंडर बीएस 6 इंजिन देण्यात आले आहे, जे जास्तीत जास्त 59 पीएस पॉवर आणि 78 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.