COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बेबी हत्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात एक बेबी हत्ती आपल्या आईजवळ मोकळ्या जागेत मस्ती करतोय, तो मैदानात बसलेल्या पक्षांच्या मागे धावतोय, जणू पक्षी आणि हा बेबी हत्ती या मोकळ्या ग्राऊंडवर खेळत आहेत. 


हा बेबी हत्ती पक्षांच्या मागे दुडूदुडू धावतो, आणि धडपडतो, आणि धडपडत पुन्हा उठतो, आणि आईच्या पायांमध्ये जाऊन लपतो, हे पाहायला खूपच सुंदर वाटतं, हा व्हिडीओ दक्षिण स्वीडनच्या बोरास प्राणी संग्राहलयातील आहे. व्हिडीओसाठी यूट्यूबचे आभार.