व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी....
विनाझंझट आणि विनाचार्ज व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना ही बातमी झटका देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपसाठी आता चार्ज भरावा लागू शकतो.
मुंबई : विनाझंझट आणि विनाचार्ज व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना ही बातमी झटका देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपसाठी आता चार्ज भरावा लागू शकतो.
एकेकाळी व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यासाठी एका वर्षासाठी ५६ रुपये आकारले जात होते. मात्र २०१६मध्ये हा चार्ज बंद कऱण्यात आला. मात्र आता पुन्हा व्हॉट्सअॅप चार्जेबल होऊ शकतो.
नवे बिझनेस मॉडेल
व्हॉट्सअॅपचे आतापर्यंत कोणतेही बिझनेस मॉडेल नाही. हे अॅप सुरुवातीपासून आतापर्यंत कोणत्याही जाहिरातीशिवाय सुर आहे. जेव्हा फेसबुकने व्हॉट्सअॅप खरेदी केले होते तेव्हा याच्या एका बिझनेस मॉडेलबाबत चर्चा केली होती. मात्र अद्याप कोणतेही ठोस मॉडेल बनवण्यात आलेले नाहीये. दरम्यान, आता अशी चर्चा आहे की फेसबुकचे नवे बिझनेस मॉडेल तयार असून ते लागू झाल्यानंतर व्हॉट्सअॅप चार्जेबल होईल.
फेसबुक, व्हॉट्सअॅप सोशल मीडिया
नव्या बिझनेस मॉडेलबाबत आधीपासूनच चर्चा सुरु होती. मात्र आता फेसबुकने नवे बिझनेस मॉडेल तयार केलेय. व्हॉट्सअॅप सध्या फ्री आहे. नव्या बिझनेस मॉडेलमध्ये फेसबुक प्रमाणे आता बिझनेस टू कस्टमर मॉडेल व्हॉट्सअॅपला दिले जाणार आहे.
असे असेल नवे फीचर
व्हॉट्सअॅपच्या नव्या मॉडेलमध्ये अॅपकडून कंपनी आणि लहान व्यापारी सरळ यूजर्सशी संपर्क साधू शकतील. हे मॉडेल टेस्टिंग फेजमध्ये आहे. दरम्यान यामुळे यूजर्सना अधिक त्रास होणार नाही कारण ज्या कंपन्यांना युजर्सने परवानगी दिलीये त्याच कंपन्या यूजर्सला कॉन्टॅक्ट करु शकणार आहेत.
कधी होणार लाँच
हे नवे फीचर लाँच होण्यास अद्याप वेळ आहे. सध्या केवळ याची चाचपणी सुरु आहे. आतापर्यंत फार कमी कंपन्यांनी या पायलेट प्रोजेक्टमध्ये भाग घेतलाय.
मॉडेल आणण्यामागचे कारण काय?
हे नवे मॉडेल आणण्यामागे दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे कंपंन्यांद्वारे व्हॉट्सअॅपला फायदा मिळेल आणि उत्पन्न वाढेल. दुसरीकडे कंपन्या सरळ यूजर्सशी संपर्क साधू शकणार आहेत. दरम्यान, सध्या याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. हे नवे फीचर कधी लाँच होणार भारतात कधी येणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.