मुंबई : जर तुम्ही बाईकचे शौकीन आहात किंवा नवीन बाईक घेण्याच्या विचारात आहात, तर एकदा बजाज ऑटोच्या या नवीन आलेल्या बाईकचे फिचर्स जाणून घ्या. बजाज ऑटोने 115 सीसी प्लॅटिना 110 बाईक बाजारात आणली आहे. नवीन प्लॅटिना 110 ची किंमत 65 हजार 920 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईकमध्ये ABS(अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम) आणि नायट्रॉक्स स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेंशन, तसेच ट्यूबलेस टायर्स सारख्या इतर फिचर्सचा समावेश आहे. बजाज प्लॅटिना 110 मध्ये एच-गियर (H Gear System)सिस्टीम आहे. तसेच सिस्टीममध्ये गिअर शिफ्ट गाईड (Gear Shift Guide-GSG)आणि एक स्मूथ गिअर दिला आहे, जे आपला प्रवास आरामदायक बनविते.


सेफ्टी फिचरबद्दल बोलताना नवीन प्लॅटिना 110 मध्ये अँटी स्कट ब्रेकिंग सिस्टीम, ट्यूबलेस टायर्स आहेत. बाईकमध्ये DTS-i इंजिन आहे. ज्यात ऍडवांस बीएस -6 तंत्रज्ञान आहे. बाईकमध्ये 11-लिटरची फ्यूल टाकी आहे.


बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले की, "मी आशा करतो, की भारतातील विविध प्रकारच्या रस्त्यांवर गाडी चालवणारे भारतीय त्यांच्यासाठी बाजारात आणलेल्या सर्वोत्तम ब्रेकिंग तंत्रज्ञानाचा गाडीचा अवलंब करतील."


 


बजाज प्लॅटिना 110 (Bajaj Platina 100)


बजाज ऑटोने एक दिवस आधीबजाज प्लॅटिना 100 इलेक्ट्रिक स्टार्ट (ES) ची नवीन वर्जन बाजारात आणले. दिल्लीत त्याची किंमत, 53हजार 920 रुपये आहे.


या बाईकमध्ये प्रगत स्प्रिंग तंत्रज्ञान वापरले गेले आहे. यात केवळ दुचाकीस्वारचं नाही तर त्याच्या मागे बसणाऱ्यालाही आरामदायक राईडचा अनुभव मिळेल.


बाईकमध्ये ट्यूबलेस टायर्स आहेत जे सुरक्षित आणि त्रास-मुक्त राइडिंगचे आश्वासन देतात.


बजाज प्लॅटिना 100 मध्ये एलईडी DRL हेडलॅम्प्स आणि उत्तम पकडसाठी रुंद रबर फूटपॅड आहेत. यात 102 सीसी, 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, डीटीएस-आय ( DTS-i)इंजिन बसविण्यात आले आहे. इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनसह बनले आहे.


बजाज प्लॅटिना 100 मध्ये ES DRUM मॅाडलची एक्स-शोरूम किंमत 59 हजार 859 रुपये आणि प्लॅटिना 100 ES DISC मॅाडलची किंमत 63 हजार 578 रुपये आहे. 100 KS मॅाडलची किंमत 52 हजार 915 रुपये आहे.