नवी दिल्ली : जर तुम्ही दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची ठरु शकते. देशातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी 'बजाज' ऑटोने (Bajaj Auto) बाइकच्या किंमतीत कपात केली आहे. किंमतीतील ही कपात सणांचा काळ लक्षात घेता करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीकडून बाइक खरेदीवर ५ फ्री सर्व्हिस आणि ५ वर्षांची वॉरंटीही देण्यात येत आहे.


८ ऑक्टोबरपर्यंत ऑफर सुरु 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही ऑफर झिरो प्रोसेसिंग फीसह ८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत वैध आहे. कंपनीची 'सीटी ११०' (CT110), 'प्लेटिना', 'पल्सर १५०', 'पल्सर २२०F', 'डोमिनार ४००' आणि 'ऍव्हेंजर'च्या सर्व मॉडेल्सवर ऑफर उपलब्ध असणार आहे. 


'CT110' वर ३ हजार २०० रुपयांची सूट देण्यात येत आहे. 'डोमिनार'वर ७ हजार २०० रुपयांची सूट आहे. बजाजची बेस्ट सेलिंग बाइक 'पल्सर १५०'वर ४ हजार २०० रुपयांची ऑफर, तर 'पल्सर २२०'वर ५ हजार रुपयांची ऑफर देण्यात येत आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट करातील कपातीची घोषणा केल्यानंतर, कंपन्यांकडून किंमतीतील कपातीची घोषणा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 



दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपन्यांकडे बीएस-४ (BS-IV) इमीशन नॉर्म्स असणाऱ्या वाहनांचा स्टॉक आहे. हा स्टॉक संपवण्यासाठी टू-व्हिलर कंपनी डिस्काउंट ऑफर करत आहे. ३१ मार्च २०२० पासून बीएस-६ (BS-VI) इमीशन नॉर्म्स लागू होणार आहे. त्यामुळे बीएस-४ (BS-IV) वाहनांचा स्टॉक क्लियर करण्याची गरज आहे. 


'बजाज'नंतर 'हीरो'कडूनही डिस्काउंट जाहीर होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.


पियागो ऑफर 


इटालियन बाइक ब्रँड 'पियागो'कडून वेस्पा आणि 'अप्रेलिया' टू-व्हिलरवर १० हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनीकडून ५ वर्षांची वॉरंटी आणि इन्श्युरन्स ऑफर करण्यात येत आहे. 'अप्रेलिया'चे बाजारात SR 125, SR 150 आणि SR 150 मॉडेल्स आहेत. 


खुशखबर! 'मारुती'च्या 'या' कार आणखी स्वस्त


 



याआधी मारुती सुझुकीनेही त्यांच्या विविध कारच्या किंमतीत ५ हजार रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे.