Best Mileage Bikes In India : रोजच्या दैनंदिन जीवनात सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे सतत वाढत असलेले पेट्रोलचे दर. जर तुमच्याकडे 110 किलोमीटरची मायलेज देणारी बाईक असेल तर विचार करा, पेट्रोलचा किती मोठा खर्च तुम्ही वाचवू शकता. यामुळे तुमच्या आर्थिक बजेटमध्ये तुम्हाला फायदा होईल आणि चार पैसे शिल्लक राहिल्याने तो पैसा इतर कामांसाठी उपयोगी पडेल. पेट्रोलमध्ये सतत वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामयच आर्थिक झळ बसते. तुमच्या या समस्येला ओळखून आज आम्ही तुम्हाला अशा काही बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्या जास्त मायलेज देतील. चला तर मग जाणून घेऊ जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल...


TVS Sport


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या बाईकची किंमत 60 हजार रुपयांपासून ते 66 हजार रुपयांपर्यंत आहे. या कंपनीची ही सर्वात जास्त विकलीजाणारी बाईक आहे. या बाईकचं इंजिन 109cc इतकं आहे तर ही बाईक 8.18bhp मॅक्झिमम पावर जनरेट करते. या बाईकची मॅनेजमेंट कॉस्ट खुप कमी आहे. टीव्हीएसच्या वेबसाईटवर लिस्टेड काही रिव्ह्यूजनुसार, ही बाईक 110km 
इतकं मायलेज देते.


Hero HF DELUXE



हिरो कंपनीच्या या बाईकची किंमत 56,070 रुपये ते 63,790 रुपये यादरम्यान आहे. या बाईकचं इंजिन 97.2cc असून 5.9kw पावर आणि  8.5Nm इतकं टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या वेबसाईटवर एका ग्राहकाच्या रिव्ह्यूनुसार, ही बाईक 100km पेक्षा जास्त मायलेज देते.  


Bajaj Platina 100 



या बाईकची किंमत 53 हजार रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे. Bajaj Platina 100 या बाईकमध्ये 102 ccचं 4 स्ट्रोक, DTS-i, सिंगल सिलेंडर इंजिन मिळतं. हे इंजिन 5.8 kW मॅक्झिमम पावर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ही बाईक 70KM पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. या बाईकची टॉप स्पीड 90 Kmph इतकी आहे.


Bajaj CT110X



या बाईकची किंमत 66 हजार रुपये (एक्स-शोरुम) आहे. Bajaj CT110X या बाईकमध्ये 115.45cc चं 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 8.6 PS मॅक्झिमम पावर आणि 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ही बाईक 70 km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.