Bajaj Pulsar 250 Eclipse Edition Launch Soon: बजाज ऑटोने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या पल्सर मोटरसायकलचा ब्लॅक-आउट एडिशनचा टीझर रिलीज केला आहे. टीझला कंपनीने एक कॅप्शनही दिलं आहे. हे कॅप्शन दुचाकी प्रेमींचं लक्ष वेधून घेत आहे.   "The Eclipse is here to outshine the night.", अशी कॅप्शन लिहिली आहे. बजाज ऑटो त्याच्या 250 सीसी पल्सर सीरिजच्या मोटारसायकलींची डार्क एडिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या दुचाकीला एक्लिप्स एडिशन संबोधलं जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत दुचाकी निर्मात्या बजाजने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पल्सर 250 सीरिजची मोटरसायकल सादर केली होती. यामध्ये पल्सर N250 आणि पल्सर F250 मोटरसायकलचा समावेश आहे. टेक्नो ग्रे, रेसिंग रेड आणि कॅरिबियन ब्लू अशा तीन रंगसंगतींमध्ये आहे. आता आगामी एक्लिप्स एडिशनला नवीन पेंट स्कीम मिळण्याची अपेक्षा आहे.


कंपनी सध्या फक्त पल्सर N250 Eclipse Edition ला आणण्याच्या तयारीत आहे.  कंपनी Eclipse Edition मध्ये Bajaj Pulsar F250 देखील सादर करू शकते. नवीन रंगसंगती सादर करण्याव्यतिरिक्त, बाइकमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत. बाइक पूर्वीप्रमाणेच स्पेसिफिकेशन्ससह ऑफर केली जाऊ शकते. नवीन बजाज पल्सर N250 आणि F250 मध्ये 249.07 सीसी, सिंगल-सिलेंडर, फोर-स्ट्रोक, ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे.


हे इंजिन 24.1 बीएचपी पॉवर आणि 21.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकला असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील दिला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बजाज पल्सर N 250 ची किंमत सध्या 1.44 लाख रुपये आहे, तर Pulsar F 250 ची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. लाँच झाल्यापासून सहा महिन्यांत 10,000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.