मुंबई : व्हॉ़ट्सएपच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तुमचा मोबाईल अवघ्या एका मिनिटात हॅक होत असल्याचं समोर आलंय. तुमच्या व्हॉट्सएपची माहिती चोरण्याचा एक मार्ग तर व्हॉट्सएपनंच युजर्सना दिला आहे. व्हॉट्सअएप वेबच्या माध्यमातून हा धोका होऊ शकतो. गुगलवर जाऊन व्हॉट्सएप वेब म्हणून वेबसाईट शोधली जाते. तिथं उजव्या कोपऱ्यातल्या तीन टिंब असलेल्या बटणावर क्लिक केलं जातं. तुमच्यासमोर बारकोड येईल. त्यानंतर ज्याच्या मोबाईलचा व्हॉट्सएपचा एक्सेस पाहिजे त्याच्या व्हॉट्सअएप ओपन केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या मोबाईलच्याही उजव्या कोपऱ्यातील तीन बटणं असलेल्या बटणावर क्लिक केलं जात. त्यानंतर आलोल्या ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये व्हॉट्सएप वेब नावाच्या पर्यायावर क्लिक केलं जातं. त्यानंतर एक स्कॅनर येतो. हा स्कॅनर बारकोडवर धरल्यानंतर दुसऱ्या मोबाईलचा सगळा डाटा पहिल्या मोबाईलवर पाहता येतो. दुसरा मोबाईलधारक कोणते मॅसेज करतो तो काय टाईप करतो हे सगळं तुम्हाला पाहता येत.



दुसरा मोबाईलचा व्हॉट्सएप शेअर झालेला आहे याचा एक आयकॉन मात्र मोबाईलवर झळकत राहतो. असं झाल्यास तातडीनं तिथून लॉ़ग आऊट करा. शिवाय सुरक्षित संवादासाठी खालील उपाययोजना करण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.


दुसऱ्या प्रकारात एमस्पाय नावाचं एक सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जातं. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यास व्हॉट्सएपसह सोशल मीडियावरील सगळे अकाऊंट्स पाळत ठेवणाऱ्यांना एक्सेस होतो. 


शिवाय मोबाईलधारकाच्या अपरोक्षही मोबाईल वापरला जातो. रिमोट हॅकिंगच्या माध्य़मातूनही अशाच प्रकारे डाटाची चोरी होते. एखादं एप्लिकेशन सुरक्षित असल्याचा दावा झाला की ते क्रॅक कसं करता येईल याचे शंभर मार्ग शोधले जातात. हे व्हॉट्सएपच्या निमित्तानं अधोरेखित झाले आहे.