How To Make Your Bed Cool Without Using Costly AC: सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने उकाडा कमी झाला आहे. मात्र जसा पाऊस विश्रांती घेतो, तसा घामाच्या धारा वाहू लागतात. त्यामुळे सीलिंग फॅन आणि कूलरच्या माध्यमातून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पण यातून हवा तसा थंडावा मिळत नाही. त्यामुळे एसी लावण्याशिवाय गत्यंत्तर नसतं. अनेकदा एसी लावण्याची पोझिशन चुकल्याने कूलिंग मिळत नाही. तसेच रुम कूल व्हायला वेळ लागतो आणि एसी बंद करताच उकाडा वाढतो. असं असताना एका खास एसीची जोरदार चर्चा सुरु आहे. हा एसी काही मिनिटात बेड थंड करतो. सध्या बाजारात विंडो, स्प्लीट आणि पोर्टेबल एसी उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला पोर्टेबल एसीच्या छोट्या वर्जनबद्दल सांगणार आहोत. हा एसी बेड एरिया कूलिंग करण्यासाठी खास पद्धतीने तयार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही ज्या एअर कंडिशनरबद्दल बोलत आहोत तो एक डबल बेड एअर कंडिशनर आहे. या एसीच्या माध्यमातून एक बेड आरामात थंड होतो. हा एसी फक्त त्या बेडच्या आजूबाजूचा भाग थंड करण्याचे काम करते.  बेडवर झोपलेल्या किंवा बसलेल्या लोकांना समान थंडावा देते. घरात महागडा एसी नसेल तरी या माध्यमातून आरामदायी झोप मिळू शकते.


बेड एअर कंडिशनर एक छोटे एसी युनिट असून ट्रायपॉड स्टँड आणि बेड कव्हरसह येतो. तुम्हाला प्रथम बेड सर्व बाजूंनी झाकून ठेवावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एअर कंडिशनर युनिट ट्रायपॉड स्टँडवर लावावा लागेल. हा एसी पलंगाच्या भागात थंडपणा ठेवते. त्यामुळे बेडवर बसलेल्या किंवा पडलेल्या व्यक्तीला थंडावा मिळतो. जर तुम्हाला हा एसी विकत घ्यायचा असेल तर याची किंमत 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान आहे. हा बेड एसी ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.