हाँगकाँग : बर्‍याच जणांना अशी सवय असते की, ते त्यांचा बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा पिन नंबरचा फोटो काढून आपल्या फोनमध्ये ठेवता किंवा जर त्यांना एखादा बँकेशी संबंधीत कॉल आला तरी त्याची शहानिशा न करता ते त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती त्यांच्याबरोबर शेअर करतात. नंतर मग हॅकर्स या माहितीचा गैरवापर करून एखाद्याचे खाते रिकामे करतात. अशीच एक घटना नुकतीच हाँगकाँगमध्ये घडला आहे. चोरट्यांनी 90 वर्षांच्या महिलेचे 32 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 240 कोटींची फसवणूक केली आहे.


चोरी कशी झाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या महिलेला एक फोन आला आणि या व्यक्तीने मी कायदा अंमलबजावणी अधिकारी आहे असे सांगितले. त्या महिलेला त्यांनी सांगितले की, तुमच्या अकाऊंटचा वापर काही लोकं बेकायदेशीर गोष्टींसाठी करत आहे. तुमचा कोणीतरी अकाऊंट हॅक केला आहे. ज्यामुळे ती महिला खूप घाबरली. इतकेच नाही तर त्या महिलेला पैसे ट्रांसफर करण्याचा सल्ला देखील देण्यात आला, जेणेकरुन तिचे पैसे बेकायदेशीर नसल्याची तपासणी होऊ शकेल. पण पैसे परत न आल्यामुळे त्या महिलेने पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.


विद्यार्थ्याला अटक


या प्रकरणात 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने या महिले फोन केला होता. या महिलेने त्यानंतर तीन खात्यात 239 कोटी रुपये जमा केले होते. यासाठी या महिलेने 5 महिन्यांत आपल्या खात्यात 11 ट्रांझॅक्शन केले आहे.