Viral Photo | कोरोना लस घेतली नाही तर हे असं होणार..., `या` अभिनेत्याच्या लूकवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
रणवीरची (Ranveer Singh) उपस्थिती असेल तर तो नेमका कोणत्या रुपात अवरतणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली असते.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी कायमच ओळखला जातो. कार्यक्रम कोणताही असो, तिथे रणवीरची उपस्थिती असेल तर तो नेमका कोणत्या रुपात अवरतणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली असते. कायमच चाहते, समीक्षक आणि इतरही सर्वांच्याच नजरा वळवण्यास भाग पाडणारा हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे तो त्याच्या नव्या रुपामुळे. (Bollywood actor Ranveer Singhs new dramatic look netizens shares hilarious memes on Twitter)
रणवीरनं नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून काही फोटो पोस्ट केले. पाहताक्षणी तर, हा रणवीरच ना? असा प्रश्नही अनेकांना पडला. कारण ठरलं ते म्हणजे त्याचा पेहराव आणि बदललेलं रुप. या पोस्टमध्ये तो निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत असून, लांब केस आणि वाढवलेली दाढी सोबतीला मोठ्या फ्रेमचा गॉगल असा लूक फ्लाँट करताना दिसत आहे. बरं त्यानं घातलेली गोल्डन ज्वेलरी अर्थात सुवर्णालंकारही लक्ष वेधत आहेतच.
आता रणवीरने फोटो पोस्ट केला आणि त्याची चर्चा झाली नाही, असं होणारच नाही. परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या नियमावरुनच नेटकऱ्यांनी बी- टाऊनच्या या स्टाईल आयकॉनची एका बाजूनं प्रशंसा केली तर काहींनी त्याची खिल्लीही उडवली.
ही कसली फॅशन असा प्रश्न काहींनी विचारला, तर सरकारनं त्याच्या या फोटोंचा वापर जाहिरातींमध्ये करायचा पाहिजे असा सल्लाही कुणी दिला. काहींनी त्याच्या या लूकवर उपरोधिक ट्विटही केले आहेत. या निमित्तानं रणवीर बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर ट्रेंडमध्येही आला खरा.
संबंधित बातम्या :
Video : तोडून टाक! पाहा 'बॉक्सिंगचा बच्चन' आलाय तुमच्या भेटीला