Vivo v30 5G: जर तुम्ही नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Vivo चा स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कंपनीने Vivo v30 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने मार्च महिन्यात हा स्मार्टफोन लाँच केला होता. या हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यामध्ये तुम्हाला दमदार प्रोसेसर आणि बॅटरी मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vivo ने आपल्या मिड रेंज डिव्हाइस Vivo V30 वर आकर्षक ऑफरची घोषणा केली असून तुम्हीही त्याचा फायदा घेऊ शकता. मोबाईलवर फ्लॅट डिस्काऊंट मिळत असून, तुम्ही ईएमआयवर खरेदी करु शकता. 


Vivo V30 ची किंमत किती? ऑफर काय?


Vivo V30 तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 33 हजार 999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 35 हजार 999 रुपये आणि 2GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे. 


कंपनीने हा मोबाईल EMI वर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही महिन्याला 2266 रुपयांच्या ईएमआयवर हा मोबाईल खरेदी करु शकता. याशिवाय बँकेच्या कार्डवर थेट 15 टक्क्यांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. यामध्ये ICICI, SBI, Yes Bank यांच्यासह इतर बँकेच्या कार्डचा समावेश आहे. तुम्ही विवोची अधिकृत बेवसाईटसह फ्लिपकार्ट आणि दुसऱ्या रिटेल पार्टनरकडून हा फोन खरेदी करु शकता.