Redmi चा `हा` फोन उद्यापर्यंत केवळ एका रूपयामध्ये मिळणार
आजपासून फ्लिपकार्टवर शिओमीचा खास फ्लॅश सेल सुरू झाला आहे.
मुंबई : आजपासून फ्लिपकार्टवर शिओमीचा खास फ्लॅश सेल सुरू झाला आहे.
उद्यापर्यंत सुरू राहणार्या सेलमध्ये शिओमी आणि Mi च्या प्रोडक्ट्सवर खास ऑफर देण्यात आल्या आहेत.
काय आहे ऑफर
सेलमध्ये शिओमीच्या हॅन्डसेटवए ३००० रूपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर Mi.comवर दुपारी दोन वाजेपर्यंत फ्लॅश सेल सुरू राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना ५९९९ चा Xiaomi 5A स्मार्टफोन केवळ १ रूपयामध्ये उपलब्ध होणार आहे. तर मोबिक्विक वॉलेटचा वापर करून तुम्ही सुमारे ४००० रूपयांची सुपर कॅश जिंकू शकता. यासोबतच ३ महिन्यांसाठी हंगामा प्ले चे सबस्क्रिप्शन आणि पुढील १२ महिन्यांसाठी हंगामा म्युझिकचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
कोण कोणत्या हॅन्डसेटवर मिळणार सूट ?
Mi Mix 2
Mi Mix 2 या फोनची किंमत ३५,९९९ रूपये आहे. मात्र सेलमध्ये हा फोन ३२,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनला फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी स्टोरोज आहे.
Mi A1
Mi A1चा रेड व्हेरिएंड लिमिटेट एडिशनमध्ये आहे. याची किंमत सुमारे १३९९९ रूपये आहे. सेलमध्ये हा फोन १२९९९ मिळणार आहे. यामध्ये 2x ऑप्टिकल झूम कॅमेरा आहे.
रेड मी नोट ४
रेड मी नोट ४ वर हजार रूपयांची सूट देण्यात आली आहे. ९-१० हजारापर्यंत तुमचं बजेट असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. 4100 mAh पावर बॅटरी चांगला बॅकअप देते.
यासोबत ब्लू टुथ स्पिकर , वायफाय राऊटर आणि एअर प्युरिफायर, शिओमीची पावर बॅंक, Mi बॅन्ड आणि हेड फोन्सवर ५०० रूपयांपासून हजार रूपयांपर्यंत सूट मिळणार आहे.