आज खरेदी करा आणि महिन्याभराने पैसे द्या !
कधी आपल्या समोर मोठा खर्च आला तर आपला बजट बिघडून जाते. तसेच महिन्याच्या शेवटी कमीतकमी खर्च कसा होईल याचा विचार करतो
मुंबई: ऐनवेळी झालेल्या खर्चामुळे आपल्या बजेटचा ताळमेळ अनेकदा बिघडतो. त्यामध्येही महिन्याच्या शेवटी आपण पैसे जपून वापरत असताना अशा अनपेक्षित खर्चामुळे सगळेच गणित कोलमडते. हीच समस्या ओळखून पेटीएमने आपल्या युजर्ससाठी पेटीएम पोस्टपेड ही नवी सुविधा सुरु केली आहे. याद्वारे आपण गरजेच्या वस्तुंची खरेदी करु शकतो.
या सुविधेमुळे खरेदी केल्यावर पैसे महिन्याभरात देण्याचे पर्याय तुमच्याकडे असणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही डीटीएच रिचार्ज करु शकता. तसेच चित्रपटाचे तिकीट आणि विमानाचे तिकीट यासारखे खर्च करु शकता. पेटीएम पोस्टपेड अॅपचा वापर केल्यावर अधिक पैसे देण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर या सुविधेसाठी कोणतीही कागदपत्रं देण्याची गरज नाही.
पेटीएम पोस्टपेडचे फायदे
पेटीएम पोस्टपेडच्या माध्यमातून मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करू शकता. तसेच चित्रपट तिकिटांची खरेदी करु शकता. तसेच ऑनलाईन शॅापिंगदेखील करु शकतो. त्यामुळे अडचणीच्यावेळी पेटीएम पोस्टपेड उपयोगी ठरणार आहे.
कशा प्रकारे मिळवणार लाभ
या सुविधेचा वापर करण्यासाठी तुमच्या पेटीएमच्या प्रोफाइलमध्ये जाऊन सेक्शन तपासणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि पॅनकार्डची माहिती दिल्यानंतर तुम्हाला लगेच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
पेटीएम पोस्टपेड माध्यमातून खरेदी केल्यावर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या अगोदर पैसे देऊ शकतात. यासाठी पेटीएमकडून तुम्हाला अलर्ट संदेश देण्यात येणार आहे. तसेच पैसे देताना पेटीएम वॅालेट, डेबिट कार्ड किंवा नेटबॅंकींगसारख्या माध्यमाचा वापर करु शकता.