नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून तसे स्मार्टफोन  बाजारात आणत आहेत. चीनमधील स्मार्टफोन कंपनी विवोने अशीच धमाकेदार ऑफर आणली आहे. स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर केवळ १०१ रुपये देऊन विवोचा स्मार्टफोन घरी घेऊन जाऊ शकता. या ऑफरमध्ये विवो V११ विवो V११ प्रो आणि विवो Y९५ या स्मार्टफोनसाठी मोठी सूट देण्यात आली आहे . ऑफरला 'न्यू फोन, न्यू यू.' असे नाव देण्यात आले आहे. या ऑफरमध्ये १०१ रुपयांचे डाऊनपेमेंट करुन ६ महिन्याच्या सुलभ हफ्त्याने स्मार्टफोन खरेदी करु शकता.


विवोस्टोअर किंवा ज्या ठिकाणी विवोचे सर्व स्मार्टफोन उपलब्ध असतील अशा स्टोअरमध्येच ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. ऑफरची कालावधी ३१ जानेवारीपर्यंत मर्यादित आहे. या माध्यमातून १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक दर असलेल्या स्मार्टफोनची खरेदी करु शकता. ग्राहकांना स्मार्टफोनची पूर्ण किंमत द्यावी लागणार, पण सुरुवातीला केवळ १०१ रुपये देऊन ते स्मार्टफोन खरेदी करु शकतात. कॅशबॅकसारखी सुविधा हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळी ऑफर देण्यात आली आहे. एचडीएफसीच्या कार्डवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के सवलत मिळणार आहे.