Calling Without Showing Number: चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये एखादी व्यक्ती खासगी नंबरवरून कॉल (Hide Phone Number) करत असल्याचं आपण पाहिलं असेल. पण आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की, खरंच असं असतं का? आयडी किंवा नाव न दिसता फोन करू शकतो का? तर ही बाब खरी आहे. तुम्हाला तुमचा कॉलर आयडी आणि ओळख लोकांसमोर उघड करायची नसेल, तर तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत. तुम्ही तुमचा फोन नंबर लपवू शकता आणि कोणालाही कॉल (Calling) करू शकता. आणि समोरच्या व्यक्तीला कळणारही नाही की कॉल कोण करतोय. तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमधून (Smartphone) तुमचा नंबर सहजपणे लपवू शकता. यासाठी बाजारात अनेक अॅप्स आणि अनेक वेबसाइट्स आहेत. यापैकी बर्‍याच वेबसाइट्स आणि अॅप्सवर ट्रायल घ्या आणि नंतर या सेवेचे सदस्यत्व घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला ही सेवा सबस्क्रिप्शन न घेता वापरायची असेल तर तुम्ही काही मिनिटांसाठी कोणाला तरी कॉल करू शकता. परंतु जर तुम्हाला ही सेवा नेहमी वापरायची असेल तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही ही सेवा आठवड्यानुसार किंवा महिन्यानुसार वापरू शकता.


'या' 6 चुकांमुळे Smartphone होतो खराब, एकदा वाचा आणि मग ठरवा


तुम्हाला वेबसाइट किंवा अॅपद्वारे एखाद्याला कॉल करायचा असेल तर प्रथम तुम्हाला अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन साइन इन करावे लागेल. साइन इन केल्यानंतर, तुम्हाला या सेवेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. तुम्ही या सेवेची सदस्यता घेतल्यानंतर, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला आयडी लपवून कॉल करू शकता. ही सेवा इंटरनेट आधारित आहे, त्यामुळे तुमच्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणेही खूप महत्त्वाचे आहे.