Automatic Car चालवणारे 99% लोक करतात ही चूक! गाडीचे ब्रेक फेल होण्याचा असतो धोका
Car Driving Tips: सध्या गाडी घेताना ऑटोमॅटिक कारला (Automatic Car) जास्त पसंती दिली जात आहे. शहरांमध्ये होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता लोकांना ऑटोमॅटिक कार जास्त योग्य वाटते. पण ऑटोमॅटिक कार चालवताना अनेकजण एक चूक करतात, ज्यामुळे गाडीचे ब्रेक फेल होण्याची शक्यता असते.
Automatic Car Driving Tips: सध्या बाजारात ऑटोमॅटिक गेअरबॉक्स (Automatic Cars) असणाऱ्या गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या गाड्यांमध्ये सतत तुम्हाला गेअर बदलावा लागत नाही. दुसरं म्हणजे या गाड्यांमध्ये सतत क्लच दाबण्याचाही त्रास नाही. जो फरक बाईक आणि स्कुटीमध्ये असतो, तोच फरक गेअर आणि ऑटोमॅटिक कारमध्ये असतो. त्यामुळे सतत गेअर न बदलता गाडी हवी तेवढी पळवता येते आणि हातही मोकळा राहतो. त्यात महिलांना या गाडी चालवणं जास्त सोपं असतं. पण ऑटोमॅटिक कार चालवताना अनेकजण एक चूक करतात. या एका चुकीमुळे तुमच्या गाडीचे ब्रेक फेल होऊ शकतात.
तुम्ही जर कधी ऑटोमॅटिक कार पाहिली असेल किंवा त्यात बसला असाल तर त्यात ड्राइव्ह मोड असतो. तुम्ही जेव्हा ड्राइव्ह मोड अॅक्टिव्हेट करता आणि ब्रेक सोडता तेव्हा गाडी धीम्या गतीने पुढे जाते. अशाप्रकारे कार सुरु असते किंवा चालते तेव्हा त्याला क्रॉलिंग (Crowling) म्हणतात. पण जेव्हा तुम्ही ब्रेक दाबता तेव्हा साहजिकपणे गाडी थांबते.
पण जेव्हा तुम्ही ब्रेक दाबलेला असतो तेव्हा तुमची गाडी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. पण तुम्ही ब्रेक दाबत गाडीला रोखून धरलेलं असतं. पण यामुळे तुमच्या ऑटोमॅटिक कारचे ब्रेक लवकरात लवकर फेल होण्याची शक्यता असते.
यावरील उपाय म्हणजे जेव्हा कधी तुमचा गाडी सिग्नलला किंवा इतर ठिकाणी थांबलेली असतो तेव्हा कारच्या न्यूट्रल किंवा पार्किंग मोडला अॅक्टिव्हेट करा.
ऑटोमॅटिक कार चालवताना या चुका अजिबात करु नका -
1) आपल्या डाव्या पायाचा वापर करु नका. डावा पाय नेहमी बाजूला ठेवा.
2) अनेकदा चालक ऑटोमॅटिक कार चालवताना दोन्ही पायांचा वापर करतात. यामुळे दुर्घटना, अपघात होण्याची भीती असते.
3) उतारावर न्यूट्रल गेअरचा वापर करु नका
4) पार्किंग गेअरचा वापर करताना आधी कार थांबवा