Car Driving Tips : वर्षानुवर्षे कार सुस्थितीत ठेवायची असल्यास या Tips वाचाच
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. गाडीचा खर्च वाढला की मायलेज (Mileage) कमी होते. अशा परिस्थितीत...
Car Driving Tips : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. गाडीचा खर्च वाढला की मायलेज (Mileage) कमी होते. अशा परिस्थितीत ग्राहक जबरदस्त मायलेज (Mileage) देणाऱ्या कार खरेदी करण्यावर भर देतात. त्यासोबतच कारचा परफॉर्मन्सदेखील (Car performance) चांगला पाहिजे असेल तर थोडा तुम्ही बदल करा. या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. जाणून घ्या या खास टिप्स.
1. या वेगाने चालवा: अनेकदा गाडी चालवताना लोक गियरकडे लक्ष देत नाहीत. चढ किंवा ब्रेकर वरून गाडी चालवताना चुकीचा गियर पडल्याने जास्त जोर लागतो. वाहनाचा वेग (Vehicle speed) त्याच्या मायलेजवर थेट परिणाम करतो. जेव्हाही तुम्ही मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवता तेव्हा गाडीला 80kmph वेगाने टॉप गियरमध्ये (Top Gear) ठेवा. त्याच्या वरचा वेग जितका जास्त असेल तितका जास्त इंधन (Oil) खर्च होईल.
2. वारंवार ब्रेक दाबणे टाळा: पुढील वाहनापासून पुरेसे अंतर राखणे. याशिवाय समोरून येणारा स्पीड ब्रेकर किंवा इतर अडथळा पाहून वेग कमी करा, म्हणजे कमी ब्रेक लावावे लागतील. असे केला तर तुम्हाला वारंवार ब्रेक (Break) द्यावा लागणार नाही.
3. क्रूझ कंट्रोल वापरा: क्रूझ कंट्रोल फीचर बऱ्याच काळापासून वाहनांमध्ये येत आहे. या फीचरच्या माध्यमातून कार तुमच्या सेट स्पीडवर फिरते. हे फीचर तुम्ही हायवे आणि मोकळ्या रस्त्यांवर वापरू शकता, जे चांगले मायलेज देखील देईल.
4. योग्य गतीने योग्य गीअर: नेहमी योग्य गीअरवर वाहन चालवल्याने तुम्हाला चांगले मायलेज मिळू शकते. उच्च गियरमध्ये कमी गती आणि कमी गियर गियरमध्ये उच्च गतीनुसार गीअर बदला. यामुळे तुमच्या वाहनाच्या इंजिनवरील दबावही कमी होतो.
5. वेग सहज वाढवा: वाहनाचा वेग हळूहळू वाढवा. अचानक वेग वाढल्याने किंवा कमी झाल्यामुळे गाडी चांगले मायलेज देत नाही. कार एकाच लेनमध्ये ठेवा, त्यामुळे गाडीचा वेगही कायम राहील.