Car Headrest to Break Glass: भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रीत केलं जात आहे. त्या दृष्टीकोनातून वाहनांमध्ये वेगवेगळे फीचर्स दिले जात आहेत. नुकतंच गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक फीचर्स गाड्यांमध्ये देण्यात आले आहेत. आपल्या वाहनांमध्ये अशी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते. कार सीटमध्ये उपलब्ध असलेले हेडरेस्ट हे देखील एक अतिशय महत्त्वाचे फीचर्स आहे. हेडरेस्टद्वारे, आपण आपत्कालीन परिस्थितीत कारची काच फोडू शकता, असा अनेकांचा समज आहे. पण यात कितपत तथ्य आहे, ते जाणून घेऊया?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण कारची काच फोडू शकता आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडू शकता, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कारच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांमध्ये वापरलेल्या काचा अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की त्यांना तोडणे कठीण असतं. हेडरेस्टद्वारे काचा फोडणं अशक्य आहे. वाहनाचे हेडरेस्‍ट काढता येतात. ते काढून तुम्ही साफ करू शकता किंवा नवीन सीट कव्‍हर बसवू शकता.


iPhone 14 चे क्रॅश डिटेक्शन फीचर पास की फेल? यूट्यूबरने चाचणी केली आणि...


वास्तविक, हेडरेस्टचे दुसरे नाव हेड रेस्ट्रेंट आहे. त्याचे खरे काम तुमचे आराम नाही तर सुरक्षितता आहे. अपघात झाल्यास कारचे हेडरेस्ट तुमचे डोके खूप मागे जाण्यापासून प्रतिबंधित करते. हेच कारण आहे की हेडरेस्ट पुढे झुकवून डिझाइन केले आहे. हेडरेस्ट काढून प्रवास करू नका, असा सल्ला दिला जातो. तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.