मुंबई : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. नवी कार घेण्यासाठी आता तुम्हाला जास्त पैसै मोजावे लागणार आहेत. कार उत्पादक कंपन्या महिंद्रा, टाटा मोटर्स आणि होंडा यांनी आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. महिंद्रानं आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये २ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना अतिरिक्त ३० हजार रुपये मोजावे लगाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं ही दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी टाटा मोटर्स, होंडा आणि हुंडाई कंपनीनंही आपल्या काही गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे.


1. ह्युंडईने त्यांची गँड आय10 गाडीची किंमत वाढवली आहे. गाडीच्या किंमतीत 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून या नव्या किंमती लागू झाल्या आहेत. या कारची किंमत 4.73 लाखांपासून 7.51 लाखपर्यंत ठेवण्यात आली आहे.


2. टाटा मोटर्सने देखील 2.2 टक्क्यांनी वाढ केली आहे. 3 महिन्यात टाटाची ही दुसऱ्यांदा वाढ आहे. एप्रिलमध्ये कारच्या किंमती 60 हजारांपर्यंत वाढल्या होत्या.


3. होंडाने त्यांच्या सर्व गांड्य़ावर जवळपास 10 हजारांपर्यंत वाढ केली आहे. 1 ऑगस्टपासून या कार महागल्या आहेत.