Car मध्ये असलेल्या `या` बटणाचा नेमका वापर कधी होतो? जाणून घ्या
रस्ते अपघाताची अनेक कारणं आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा गाडी मध्येच बंद पडते आणि पथदिवे नसल्याने अंदाज येत नाही. यामुळे अपघात घडतात. यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांनी अॅक्टिव आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स देतात. यापैकी एक फीचर्स म्हणजे इतर वाहनांना संभाव्य धोक्याची चेतावणी देते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे फीचर देण्यात आलं आहे.
Car Hazard Lights: रस्ते अपघाताची अनेक कारणं आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा गाडी मध्येच बंद पडते आणि पथदिवे नसल्याने अंदाज येत नाही. यामुळे अपघात घडतात. यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांनी अॅक्टिव आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स (Safety Feature) देतात. यापैकी एक फीचर्स म्हणजे इतर वाहनांना संभाव्य धोक्याची चेतावणी देते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे फीचर देण्यात आलं आहे. या लाइट्सच्या माध्यमातून वाहन काही कारणास्तव थांबल्याची सूचना देते. लाइट्स चालू करण्यासाठी, कारमध्ये हॅझर्ड्स लाइट्स (Car Hazard Lights) बटण दिलेले आहे, जे दाबताच हॅझर्ड्स लाइट्स चालू होतात आणि पुन्हा तेच बटण दाबताच बंद होतात. या लाईट्स वापरण्यास अतिशय सोप्या आहेत परंतु बरेच लोक गैरवापर करतात. लाईट्स कधी वापराव्यात? जाणून घ्या
हॅझर्ड्स लाईट्स कधी वापराव्यात?
हायवे किंवा रस्त्याच्या डाव्या बाजूला कार सुरक्षितपणे (कोणत्याही कारणास्तव) पार्क केलेली असताना हॅझर्ड्स लाइट्स वापरा.
जर तुमच्याकडे कारचा टायर पंक्चर झाला असेल, तर रस्त्याच्या डाव्या बाजूला टायर बदलताना हॅझर्ड्स लाइट्स वापरा.
बिघाडामुळे वाहन रस्त्यातच थांबलं असेल तर हॅझर्ड्स लाइट्स सुरु ठेवाव्यात. त्यासोबत गाडीच्या आजूबाजूला हॅझर्ड्स ट्रायअँगलही लावावेत.
Car Safety: 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेली चायना कार भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
हॅझर्ड्स लाइट्स कधी वापरू नयेत?
कार वळवत असताना देखील हॅझर्ड्स लाइट्स सुरु करू नका. कारण बहुतेक कारमध्ये हॅझर्ड्स लाइट्स सुरु असताना टर्न इंडिकेटर काम करत नाहीत.
लबोगद्यात प्रवेश करताना हॅझर्ड्स लाइट्स सुरू ठेवणं धोक्याचं ठरू शकतं.
काही जण कमी दृश्यमानतेत हॅझर्ड्स लाइट्स वापरतात. पण, यात मतांतरं असू शकतात. काहींना ते बरोबर वाटतं, पण काहींना ते चुकीचंही वाटतं.