मुंबई : टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर रिलायंस जिओ लागोपाठ वेगवेगळे धमाके करत आहे. आता जिओ रिचार्ज आणखी स्वस्त झालं आहे. जिओच्या रिचार्जवर तुम्हा ७६ रुपये परत मिळवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लिपकार्टच्या मोबाईल वॉलेटमधून जिओ प्रिपेड रिचार्जवर ७६ रुपये कॅशबॅक दिलं जाणार आहे. जिओच्या समर सरप्राइज आणि धन धना धन ऑफरचा सर्वाधिक वापर केला जाता आहे. नवा धन धना धन ऑफरमध्ये कस्टमरला ३९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो ज्यामध्ये ८४ दिवस राज १ जीबी डेटा मिळतो.


कशी मिळवाल ऑफर


- ही ऑफर १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. यामध्ये ७६ रुपयांचं कॅशबॅक दिलं जाणार आहे.
- यासाठी कमीत कमी ३०० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
- ही ऑफर जिओ प्रिपेड कस्टमर्ससाठी आहे. जे पहिल्या रिचार्जवर मिळेल.
- ही ऑफर iOS और Android डिवाइसवर उपलब्ध आहे.