Google ला धक्क्यावर धक्के! `या` कारणामुळे भारत सरकारने ठोठावला 936 कोटींचा दंड
कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळे आयोगाने गुगलला पुन्हा दणका देत (Google 2nd antitrust penalty) दंड ठोठावलाय.
Google fine : आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला 1337 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. अँड्रॉइड मोबाईल डिव्हाइस इकोसिस्टममध्ये एकाहून अधिक बाजारपेठेमध्ये आपल्या प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याबद्दल भारतीय स्पर्धा आयोगाने गुरुवारी टेक दिग्गज कंपनी गुगलला 1337.76 कोटींचा दंड ठोठावला. त्यानंतर आता गुगलला धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय. गुगलवर आणखी एक दंड ठोठावण्यात आला आहे. (CCI fines Google Rs 936 crore in second antitrust penalty)
नेमकं प्रकरण काय?
भारतीय स्पर्धा आयोग (CCI) नुसार, जर कोणत्याही अॅप डेव्हलपरला Google Playstore वर त्याचे अॅप विकायचे असेल किंवा अॅप / मोबाइल गेमद्वारे पैसे कमवायचे असतील तर त्याला Google ची पेमेंट सिस्टम वापरावी लागेल. सीसीआयच्या मते हे भारतीय स्पर्धा कायद्याचं उल्लंघन आहे. कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळे आयोगाने गुगलला पुन्हा दणका देत (Google 2nd antitrust penalty) दंड ठोठावलाय.
Google ला दिले आदेश -
दरम्यान, CCI ने गुगलवर 936.44 कोटी रुपयांचा (Google antitrust penalty) दंड ठोठावला. यासोबतच गुगलला थर्ड पार्टी पेमेंट सिस्टम आणि UPI अंतर्गत गुगल प्ले स्टोअरवर अॅप डेव्हलपरला पैसे कमवण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच, Google कोणत्याही APP डेव्हलपरला स्वतःची पेमेंट सिस्टम वापरण्यास भाग पाडू शकत नाही, असे आदेश देखील देण्यात आलेत.
आणखी वाचा - Google ला 1337 कोटींचा दणका, वाचा नेमकं प्रकरण काय?
गुगलने बाजारपेठेमध्ये स्पर्धा संपवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आरोप देखील करण्यात आला होता. लोकशाहीत वृत्त माध्यमांनी बजावलेली भूमिका कमी लेखता येणार नाही. डिजिटल गेटकीपर कंपन्या त्यांच्या वर्चस्वाचा दुरुपयोग करुन स्पर्धात्मक प्रक्रियेला हानी पोहचवू नये, असंही CCI ने म्हटलं होतं. त्यानंतर आता गुगलला पुन्हा धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय.