तुमचं आधार कार्ड कोण वापरतंय ? पाहा...
तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? ते तुम्ही असं चेक करू शकता, तुमच्या आधार कार्डची जी माहिती आहे, ती अत्यंत गोपनीय आहे.
मुंबई : तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? ते तुम्ही असं चेक करू शकता, तुमच्या आधार कार्डची जी माहिती आहे, ती अत्यंत गोपनीय आहे.
माहिती Uidai च्या वेबसाईटवर
ही माहिती किंवा तुमचं आधार कार्ड कुठे वापरलं, जातंय किंवा नाही, याची पडताळणी आधार प्राधिकरण करणार आहे. तुम्हाला ही माहिती Uidai च्या वेबसाईटवर पाहता येते.
बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरलं जात, यामुळे आपलं आधार कुणी गैरप्रकारे वापरत तर नाही ना, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड कुठे कुठे वापरलं जातंय, ते पाहू शकता.
बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय?
आधार प्राधिकरणाच्या https://uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
Aadhar authentication history हा पर्याय दिसेल.
यावर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब ओपन होईल.
या टॅबमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्याखाली समोरच दिलेला सिक्युरिटी कोड टाका.
सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर तुमच्या आधार डेटाबेसशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
पुढे गेल्यानंतर तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे, तो पर्याय निवडा.
सर्व प्रकारची माहिती हवी असल्यास All हा पर्याय निवडा
किती तारखेपासून किती तारखेपर्यंतची माहिती पाहिजे, याचा उल्लेख करा.
तारीख निवडल्यानंतर किती नोंदी पाहिजे हा पर्याय निवडा.
ही सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पुढे जा.
सर्व तपशील दाखवला जाईल, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं, याची माहिती मिळेल.
मिळालेल्या माहितीमध्ये काही शंका वाटल्यास त्याची तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला आहे.
1947 या क्रमांकावर आधार प्राधिकरणाला संपर्क साधून तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता.