मुंबई : जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.


गूगल विरोधात तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आणि कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी (सीयूटीएस) यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर ही कारवाई करण्यात आली आहे.


गूगलच्या लाभासाठी 


गूगलविरोधात २०१२ मध्ये व्यवसाय करताना स्वतःच्या फायद्यासाठी अन्यायकारक पद्धती वापरल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने सीसीआयने गूगलवर कंपनीच्या एकूण उलाढालीच्या ५ टक्के दंड ठोठावला. 


गूगलवर आरोप


मॅट्रिमॉनी डॉट कॉम या कंपनीने गूगलविरोधात तक्रार केली होती. गूगल सर्च केलेल्यावर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वेबसाईटच्या यादीत मॅट्रिमॉनी डॉट कॉम या कंपनीविषयी गूगलने अन्यायकारक प्रक्रियांचा वापर केल्याचा आरोप होता. तो सिद्ध झाल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.