मुंबई : टेलिकॉम सेक्टरमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलायन्स जिओच्या १५०० रुपयांच्या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी एअरटेल लवकरच नवा स्मार्टफोन घेऊन येत आहे. एअरटेलच्या या फोनची किंमत २ हजार रुपयांच्या जवळपास असेल. ऑक्टोबर महिन्यामध्येच एअरटेलचा हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो, अशी माहिती इंडिया टूडेनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलचा हा स्मार्टफोनमध्ये जिओ फोनप्रमाणेच इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सुविधा असेल. तसंच एअरटेलच्या या स्मार्टफोनमध्ये 4G सिमकार्ड, चार इंचाचा डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा, VoLTE कॉलिंग, ऍन्ड्रॉईड, हँडसेट आणि 1GB रॅम असण्याची शक्यता आहे.